घरमनोरंजन'बिग बॉस मराठी २' चं सुत्रसंचालन करणार हा आघाडीचा दिग्दर्शक

‘बिग बॉस मराठी २’ चं सुत्रसंचालन करणार हा आघाडीचा दिग्दर्शक

Subscribe

पहिल्या पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने ज्यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने जिंकली. महेश मांजरेकर नुकतेच या कार्यक्रमाच्या एका प्रोमोचे शूट करताना दिसले.

लवकरच बिग बॉस मराठीच्या दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दुसऱ्या सीझनमध्ये कोण कोण कलाकार असणार? या दुसऱ्या सीझनच सुत्रसंचालन कोण करणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे. अद्याप कोण कोण सेलेब्रेटी यात दिसणार हे कळलं नाही. पण या दुसऱ्या सीझनच्या सुत्रसंचालकाच नाव समोर आलं आहे. बिग बॉस मराठीचा दुसरा सीझन सुत्रसंचालनही दिग्दर्शक महेश मांजरेकरच करणार आहेत.

mahesh manjrekar

- Advertisement -

पहिल्या पर्वामध्ये सूत्रसंचालनाच्या अनोख्या स्टाईलने ज्यांनी प्रेक्षक आणि सदस्य सगळ्यांचीच मने जिंकली. महेश मांजरेकर नुकतेच या कार्यक्रमाच्या एका प्रोमोचे शूट करताना दिसले. महेश मांजरेकर या प्रोमोमध्ये राजकीय नेत्याच्या वेशभूषेत दिसणार आहेत. आता हा प्रश्न प्रेक्षकांना नक्कीच प्रेक्षकांना पडू शकतो कि, या वेळेस बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एखादी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तर दिसणार नाही ना? पण याच उत्तर तुम्हाला सीझन सुरू झाल्यावरच मिळणार आहे.

ही नावं आहेत चर्चेत

- Advertisement -

छोट्या पडद्यावरील अभिनेता शैलेश दातार, अक्षया गुरव, वीणा जगताप, अर्चना निपणकर, गौतम जोगळेकर यांच्या नावांसोबतच गायिका आणि अभिनेत्री केतकी माटेगावकर हिच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात केतकी जाणार असं म्हटलं जात आहे. त्याचप्रमाणे रसिका सुनील, सुप्रिया पाठक यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -