लग्नाबद्दल जास्त विचार करत नाही – कतरिना कैफ

अभिनेत्री कतरिना कैफने लग्न आणि प्रेमसंबधांबद्दल मोठा खुलासा केला आहे. लग्नाबद्दल जास्त विचार करत नसल्याचे तिने सांगितले आहे.

Mumbai
katrina kaif
अभिनेत्री कतरिना कैफ

अभिनेत्री कतरिना कैफ ‘थग्स ऑफ हिंदूस्तान’ चित्रपटानंतर आता ‘झिरो’ चित्रपटात दिसणार आहे. प्रेमसंबध आणि लग्नावर केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेत्री कतरिना कैफ पुन्हा चर्चेत आली आहे. लग्नाचा विचार आपल्या डोक्यात आहे मात्र त्यावर आपण फार विचार करत नाही असे ती म्हणाली. २०१६ मध्ये अभिनेता रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर तिने आपल्या प्रेमसंबधांची वाच्यता केली आहे. रणबीर कपूरचे नाव सध्या आलिया भट्टशी जोडल्या जात आहे.

काय म्हणाली कतरिना

“योग्य वेळी प्रेम होईल हे मला माहिती आहे. लग्नाची गोष्ट अजून माझ्या डोक्यात आहे मात्र मी त्यावर अधिक विचार करत नाही. लग्नाच्या गोष्टी मी सध्या देवावर सोडला आहे. हे पहिल्यांदाच होते आहे की मी स्वतःवर लक्ष देते आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रेमसंबधात असता त्यावेळी तुम्हाला स्वतःला वेळ देता येत नाही. ब्रेकअप झाल्यानंतर आता मी स्वतःवर पूर्ण पणे लक्ष देऊ शकते. त्यामुळे मला माझ्या कामावर लक्ष केंद्रित करता येते आहे.”- अभिनेत्री कतरिना कैफ