घरमनोरंजनPulwama Attack : जावेद अख्तर - शबाना आझमींनी रद्द केला पाकिस्तान दौरा

Pulwama Attack : जावेद अख्तर – शबाना आझमींनी रद्द केला पाकिस्तान दौरा

Subscribe

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी ट्विटर करुन पाकिस्तानचा दौरा रद्द करत असल्याची माहिती दिली.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचे बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर अनेक सेलिब्रिटींनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर गीतकार जावेद अख्तर आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी पाकिस्तानचा दौरा रद्द केला आहे. दोघेही पाकिस्तानच्या कराची आर्ट काऊंसिलसाठी जाणार होते. त्यांना पाकिस्तानी कवी कैफी आजमी यांच्या कार्यक्रमाचे आमंत्रण आले होते. या हल्ल्यानंतर जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांनी ट्विटर करुन पाकिस्तानचा दौरा रद्द करत असल्याची माहिती दिली.

- Advertisement -

पाकिस्तानचा दौरा रद्द

जावेद अख्तर यांनी केलेल्या ट्विटरमध्ये असे म्हटले आहे की, ‘कराची आर्ट काऊंसिलने शबाना आझमी आणि मला कराची येथे कैफी आजमी यांच्या कवितावर होणाऱ्या लिटरेटर कॉन्फरन्स या कार्यक्रमाचे आमंत्रण आले होते. दोन दिवसापूर्वी हे आमंत्रण देण्यात आले होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही या कार्यक्रमाला जाणे रद्द केले. १९६५ मध्ये इंडो-पाक युध्दावेळी कैफी आजमी यांनी एक कविता लिहिली होती ”और फिर कृष्णा ने अर्जुन से कहा”.’

- Advertisement -

माझे सीआरपीएफशी चांगले संबंध

कैफ आझमी हे शबाना आझमीचे वडील आणि जावेद अख्तर यांचे सासरे आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट पसरली आहे. या हल्ल्यानंतर काही वेळाच जावेद अख्तर यांनी ट्विट करुन निंदा व्यक्त केली. यामध्ये त्यांनी असे सुध्दा म्हटले आहे की, ‘माझे सीआरपीएफशी चांगले संबंध आहेत. मी त्यांच्या एंथम सॉन्ग लिहिले आहे. पेनाला कागदावर ठेवण्याआधी मी अनेक सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या हल्ल्यात जे जवान शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे.’ दरम्यान, शबाना आझमी यांनी देखील या हल्ल्याचा तीव्र निषेध करत ट्विट केले आहे.

या सेलिब्रिटींनी केला निषेध

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील सलमान खान, आमिर खान, विक्की कौशल, अनुपम खेर, प्रियंका चोपडा, अभिषक बच्चन, स्वरा भास्कर, अक्षय कुमार, सुनीर ग्रोवर, मनोज वायपेयी, तापसी पन्नू, वरुण धवन या अनेक सिलिब्रिटींनी ट्विटरवरुन या हल्ल्यावर तीव्र राग व्यक्त केला आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे कार्यक्रम रद्द केले.

हेही वाचा – 

या क्रूर दहशतवाद्याने घडवून आणला दहशतवादी हल्ला

Pulwama attack : पुलवामा भ्याड हल्ल्याची धमकी खरी ठरली!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -