घरफिचर्सनिसर्ग सुदंर तारकर्ली

निसर्ग सुदंर तारकर्ली

Subscribe

तारकर्ली हे कोकणातील अरबी समुद्राच्या किनार्‍यावरील पर्यटन स्थळ आहे. जगातील सर्वात स्वच्छ व सुंदर बीच म्हणून तारकर्ली बीचला मान्यता मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात हे निसर्गरम्य गाव आहे. मुंबईपासून ५४६ किमी अंतरावर तारकर्ली वसलेले आहे. मालवण शहराच्या दक्षिणेला ८ किमी अंतरावर तारकर्ली आहे. येथे कर्ली नदी व अरबी समुद्राचा संगम पाहायला मिळतो.

दावा कोकणची निळी निळी खाडी,
दोन्ही तीरांना हिरवी हिरवी झाडी,
भगवा आबोली फुलांचा ताटवा,
गोमू माहेरला जाते हो नाखवा,
हिच्या घोवाला कोकण दाखवा.

या पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेल्या वैशाख वणवा या चित्रपटातील गाण्याप्रमाणेच तारकर्लीचे वर्णन करता येईल.तारकर्ली हे कोकणातील अरबी समुद्राच्या किनार्‍यावरील पर्यटन स्थळ आहे. जगातील सर्वात स्वच्छ व सुंदर बीच म्हणून तारकर्ली बीचला मान्यता मिळाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात हे निसर्गरम्य गाव आहे. मुंबईपासून ५४६ किमी अंतरावर तारकर्ली वसलेले आहे. मालवण शहराच्या दक्षिणेला ८ किमी अंतरावर तारकर्ली आहे. येथे कर्ली नदी व अरबी समुद्राचा संगम पाहायला मिळतो.

- Advertisement -

तारकर्ली येथे पोहोचल्यावर समुद्राची गाज ऐकून, समुद्राच्या फेसाळत्या लाटा पाहून, रुपेरी, स्वच्छ वाळूचा किनारा पाहून पर्यटक सगळा शीण, ताणतणाव विसरतात.तारकर्लीत बीचवर समुद्रस्नानाचा, सूर्यास्ताचा आनंद घेऊन पर्यटक सुखावतात.
दुसर्‍या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दाखविणार्‍या सिंधुदुर्ग किल्याला भेट देता येते. मालवण जेट्टीवरून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी सुटतात. किल्ल्यावर तटबंदीमध्ये शिवाजी महाराजांच्या पायांचे ठसे पाहता येतील. किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे जगातील एकमेव मंदिर पहावयास मिळते. येथे त्यांची तलवारही ठेवलेली आहे. राणीची वेळा हे राण्यांचे समुद्र स्नानाचे ठिकाणही पाहता येते. किल्ला फिरून झाल्यावर पुन्हा जेट्टीवर आणून सोडतात. जेट्टीवरून स्कुबा डायव्हिंग व स्नॉर्केलिंग करण्यासाठी दुसर्‍या बाजूने बोटी सुटतात. त्या बोटीने जाऊन स्कुबा डायव्हिंग व स्नॉर्केलिंगचा आनंद घेऊ शकता. यासाठी सोबत एक्स्ट्रा कपडे ठेवावेत.

बोटीवर चेंजिंग रूम्स असतात किंवा जेट्टीवर वॉशरूममध्ये जाता येते.नंतर मालवण बाजारपेठेत जेवता येते. बाजारपेठेत खाजे, खडखडे लाडू, कोकम सरबत, आंबापोळी, आवळा कँडी, आमरस, काजू, काजू कॅटबरी, फणस पोळी, कोळंबी लोणचे आणि इतर कोकणी मेवा खरेदी करता येते. त्यानंतर मेढा येथील सुवर्ण गणेश मंदिर पाहता येते. हे मंदिर कालनिर्णयकार जयंत साळगावकर यांनी शास्त्रोक्त पद्धतीने बांधले आहे. रॉक गार्डन हे किनारी भागात वसवलेले गार्डन पाहू शकतो. येथे दगडी कासव, खेकडे बनवले आहेत. येथे छोट्या मुलांसाठी ट्रेनसुद्धा चालवली जाते. तिसर्‍या दिवशी सकाळी फ्रेश होऊन नाश्ता करून देवबाग संगमावर बॅकवॉटर पॉईंटवर जाता येते. येथून भोगवे – निवती बॅकवॉटरसाठी बोटी मिळतात. कडक उन्हाच्या आधी डॉल्फिन दिसण्याची शक्यता असते. नंतर वॉटर स्पोर्ट्स पॉईंटवर जाता येते. येथे वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा (बनाना राईड, कयाकिंग, स्पीड बोट, पॅरासेलिंग इ.) आनंद घेऊ शकता. दुपारचे जेवण तारकर्ली येथे घेऊन आराम करावा. संध्याकाळी तारकर्ली बीचवर सूर्यास्तदर्शन व समुद्रस्नानाचा आनंद घेऊ शकतात.

- Advertisement -

कोकण रेल्वेने कुडाळ स्टेशनवर उतरल्यास तेथून तारकर्लीला जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. एस. टी. चा पर्याय हवा असल्यास मालवण एस. टी. ने मालवण स्टॅण्डवर उतरावे. येथून तारकर्लीला जाण्यासाठी दुसरी एस. टी. किंवा रिक्षा मिळते. पीक अप, ड्रॉप आणि लोकल फिरण्यासाठी भाड्याच्या गाड्यांची सोयही उपलब्ध आहे. मुंबई, पुणे, गोवा येथून रोज लक्झरी बसेस व एस. टी. तसेच शिवशाही बस मालवणसाठी सुटतात. संध्याकाळच्या बसने निघाल्यास सकाळी मालवण येथे पोहोचता येते. पहाटेची तेजस किंवा जनशताब्दी ट्रेनने गेल्यास दुपारपर्यंत कुडाळला उतरता येते. तुतारी, मँगलोर एक्स्प्रेस, कोचुवेल्ली एक्सप्रेस, कोकणकन्या, मांडवी, मत्स्यगंधा, दिवा – मडगाव ट्रेन, बिकानेर ट्रेन इत्यादी ट्रेन्स कणकवली किंवा कुडाळला थांबतात. गोव्यातील दाबोलीम हे जवळचे विमानतळ आहे. चिपी येथे नवीन विमानतळ तयार होत आहे.

हे विमानतळ गणेश चतुर्थीच्या दरम्यान सुरू करण्यात येईल असे शासनातर्फे सांगण्यात आले आहे.
तारकर्ली येथे राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे पर्यटन संकुल उपलब्ध आहेत. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या अधिकृत निवास – न्याहारी व्यवस्था आहेत. किनार्‍याजवळ माडांच्या बनांमध्ये गावकर्‍यांची स्वतःची राहती घरे आहेत. त्यासोबत त्यांनी पर्यटक निवास तयार केले आहेत. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या बोटीही निवासासाठी उपलब्ध आहेत. एसी रूम्स, नॉन – एसी रूम्स, कॉटेजेस, डॉर्मेटरी हॉल अशा विविध व्यवस्था येथे उपलब्ध आहेत. तारकर्लीप्रमाणेच चिवला बीचही नितांत सुंदर आहे. येथेही खाडी व समुद्राचा संगम पाहता येतो. चिवल्यालाही महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या अधिकृत निवास – न्याहारी व्यवस्था आहेत. येथेही आता देवबागप्रमाणे वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यात आले आहेत. देवबाग येथेही राहण्याच्या व्यवस्था उपलब्ध आहेत. अशा या नितांत सुंदर तारकर्लीस जरूर भेट द्या.


-तृप्ती संजय परब

कोकण उद्योग – पर्यटन विकास संस्था

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -