घरट्रेंडिंगBudget 2019 : भारतीय अर्थसंकल्पाविषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

Budget 2019 : भारतीय अर्थसंकल्पाविषयी ‘या’ गोष्टी तुम्हाला माहित आहे का?

Subscribe

या अर्थसंकल्प सादर करण्याविषयी अनेक परंपरा चालत आल्या असून या अर्थसंकल्पात काळानुसार अनेक बदल घडून येत आहे.

सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्यानंतरचा मोदी सरकारमधील अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज संसदेमध्ये अर्थ संकल्प सादर करत आहे. या बजेटकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे, बजेटमध्ये सामान्य माणसांसाठी, नोकरदारांसाठी शेतकऱ्यांसाठी नेमक्या कोणत्या तरतुदी असणार आहेत हे समजणार आहे. मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.

budget 2019 to present today by finance minister nirmala sitharaman

- Advertisement -

या अर्थसंकल्प सादर करण्याविषयी अनेक परंपरा चालत आल्या असून या अर्थसंकल्पात काळानुसार अनेक बदल घडून येत आहे.

अर्थसंकल्प म्हणजे…

ज्या संकल्पात आर्थिक धोरणे जाहीर होतात त्यास अर्थसंकल्प असे म्हणतात. आर्थिक धोरणे जाहीर होणाऱ्य़ा संकल्पास अर्थसंकल्प म्हटले जाते. प्रत्येक देश, राज्य ते नगरपालिका आणि ग्रामपंचायत देखील आपला अर्थसंकल्प सादर करत असते. या सादर होणाऱ्य़ा अर्थसंकल्पात निधी, खर्च, लेखे, तूट, मागण्या, विनीयोजन याचे आर्थिक नियोजनाची रूपरेषा सादर केली जाते.

भारतीय अर्थसंकल्पाबद्दल…

  • भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ११२ नुसार देशाचे वर्षभराचे आर्थिक नियोजन अर्थात अर्थसंकल्प सादर केला जात असून हे बजेट अर्थात देशाचे वित्त मंत्री मांडत असतात.
  • यापुर्वी २००० सालापर्यंत अर्थसंकल्प संध्याकाळी ब्रिटीशकालीन पद्धतीने ५. ०० वाजता संसदेत सादर करण्याची प्रथा होती, मात्र २००१ साली भाजपचे शासन असताना यशवंत सिंह अर्थमंत्री असताना ही प्रथा बदलून सकाळी ११.०० वाजता बजेट मांडण्याची प्रथा सुरु झाली.
  • ब्रिटनमध्ये सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जायचा परंतु त्याच्या वेळेनुसार भारतीय संसदेत संध्याकाळी ५ वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा होती. मात्र भारतात ५ वाजले असताना त्यावेळी ब्रिटनमध्ये सकाळचे ११-११.३० ची वेळ असायची.

स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प

  • स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प हा आर के शन्मुखम शेट्टी यांनी २६, नोव्हेंबर, १९४७ संसदेत सादर केला होता. तसेच १९९१-९२ मध्ये अंतिम आणि अंतरिम बजेट वेगवेगळ्या पक्षांच्या दोन अर्थमंत्र्यांनी सादर केला. यशवंत सिंह यांनी अंतरिम बजेट संसदेत मांडला. तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी सादर केला होता.
  • मोरारजी देसाई ज्यावेळी अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान होते त्यावेळी सर्वात जास्त १० वेळा बजेट सादर करण्याचा मान यांना मिळाला. यामध्ये पाच वार्षिक आणि त्यांच्या पहिल्याच कार्यकाळात एक अंतरिम अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी तीन अंतिम आणि १ अंतरिम बजेट सादर केला.
  • बजेट संसदेमध्ये मांडण्याच्या एक आठवडा अगोदर त्याचे प्रिंटींग पूर्ण होते. ह्यामध्ये असलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंद एका आठवड्यासाठी दिल्लीच्या नॉर्थ ब्लॉक मध्येच असतो. त्यांना कोणालाही भेटता येत नाही.
  • अर्थसंकल्पाचे पेपर हे अर्थमंत्रालयाच्या प्रेसमध्ये छापले जातात. अर्थसंकल्प सादर करण्याच्या एक आठवड्याआधी प्रेसमधील कर्मचारी मंत्रालयातच थांबून काम करतात आणि या काळात त्यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क नसतो.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -