Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश कल की बात पुरानी

कल की बात पुरानी

एखादा सकारात्मक विचार आपल्या आयुष्याची वाट बदलत असतो. लॉकडाऊनच्या काळात एकमेकांना भेटू शकलो नाही. पण सोशल मीडियाने तितकेच जवळ देखील आणले. आपण पाठीमागे वळून पाहत असताना फ्लॅशबॅक स्वरूपात आयुष्य समोर आलेलं दिसतं. हे सर्व संपणार आहे का..? समोर काय होणार आहे..? हे वर्षसुद्धा तसेच जाईल का..? असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री आपण काही जणांनी विचारही केला असेल. नवीन वाट शोधण्याचा. नवा संकल्प पुढे घेऊन जाण्याचा.. त्याची आखणी योग्य प्रकारे केली असेलच. चांगले संकल्प करायलाच हवेत. त्या सर्वच स्वप्नांना उभारी मिळावी. तुमची स्वप्न पूर्ण व्हावीत या शुभेच्छा आहेतच.. यावर्षीच्या या लेखासोबत.

Related Story

- Advertisement -

छोड़ो कल की बातें कल की बात पुरानी…. ये दिन सुनहरे, आने वाले साल को सलाम, जो बीता वह कल था, जिंदगी एक सफर है सुहाना यहां कल क्या हो किसने जाना.. या गाण्यांच्या तालावर आनंद व्यक्त करत तरुणाईने सर्वांनाच 2021 या नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, आणि या वर्षाचे स्वागत जल्लोषात केले. गतवर्षीचा लेखाजोखा प्रत्येकजण मांडत असतो. आपल्या हातातून काय सुटलं, आपल्याला काय करायचं राहून गेलं, या सगळ्यांचा हिशोब आयुष्याच्या डायरीत तपासत असताना काही दुःखद आणि काही सुखद क्षणांची आपल्याला साथ होती. आयुष्य कसं जगायचं आणि नेमकं कोणत्या प्रकारे ही ज्याची त्याची कला आहे. पण तरीही गतवर्षी आपण एका मोठ्या संकटाचा सामना केला. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना विषाणू सोबत जगभरातील सर्वच देशांनी लढा दिला. एकीकडे 2020 हे महासत्तेचे वर्ष किंवा एक वेगळा अनुभव देणारे वर्ष म्हणून आपण घोषित केले होते.

एक वेगळी संकल्पना या वर्षाची होती पण असे काही घडून जाते की, सर्व स्वप्न आहे तिथेच राहतात. तरीसुद्धा याचा अर्थ हा होत नाही की, राहिलेले स्वप्न आपण या वर्षात पूर्ण करू शकत नाही. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. एखादा सकारात्मक विचार आपल्या आयुष्याची वाट बदलत असतो. लॉकडाऊनच्या काळात एकमेकांना भेटू शकलो नाही. पण सोशल मीडियाने तितकेच जवळ देखील आणले. आपण पाठीमागे वळून पाहत असताना फ्लॅशबॅक स्वरूपात आयुष्य समोर आलेलं दिसतं. हे सर्व संपणार आहे का..? समोर काय होणार आहे..? हे वर्षसुद्धा तसेच जाईल का..? असे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. 31 डिसेंबरच्या रात्री आपण काही जणांनी विचारही केला असेल. नवीन वाट शोधण्याचा. नवा संकल्प समोरून घेऊन जाण्याचा.. त्याची आखणी योग्य प्रकारे केली असेलच. चांगले संकल्प करायलाच हवेत. त्या सर्वच स्वप्नांना उभारी मिळावी. तुमची स्वप्न पूर्ण व्हावीत या शुभेच्छा आहेतच.. यावर्षीच्या या लेखासोबत.

- Advertisement -

सोशल मीडिया आणि युवा हे सदर लिहीत असताना अनेक अनुभव आले. थोड्याबहुत प्रमाणात सोशल मीडिया वापरणारा मी वेगवेगळ्या बाजू समजून घेत गेलो. अनेक सोशल मीडिया वापरणार्‍या तरुणांना भेटलो, त्यांचे अनुभव विचारले, जगात सोशल मीडियावर कोणत्या गोष्टी चर्चेत आहेत. हे सगळं समजून घेत गेलो. आणि नंतर लक्षात आले की, सोशल मीडियाने सर्वांच विश्व व्यापलं आहे. अनेक युवक-युवती सोशल मीडियाद्वारे वेगवेगळ्या चळवळी चालवतात. समाजाचे प्रश्न सोडवतात. हेस्टॅक वापरून सरकार व समाजात जाणीव जागृती घडवून आणतात. काही तरुण याद्वारे आपला आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करतात. आपली जगण्याची भाषा बदलली तशीच सोशल मीडियाची भाषासुद्धा बदलत आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रात सर्वच गोष्टी ऑनलाईन होत गेल्या आणि आपल्या सर्वांनाच ऑनलाइनची सवय लागून गेली. भाष्यकारांनी भाकीत केले होते की, एक दिवस सोशल मीडियामुळे आपल्या तरुणाईचे मोठे नुकसान होणार, त्यातून आपल्याला कुणीच सावरू शकणार नाही. हे भाकीत खरे ठरले का..? याचे उत्तर अजून सांगता येणार नाही. मान्य करूयात जे आहारी गेले त्यांचे नुकसान झाले. पण जे योग्य वापर करत आहेत. त्याचा समाजाला खूप मोठा फायदा होत आहे. गतवर्षी मी काही लेखांमध्ये उदाहरणासह अनेकांचे अनुभव सांगितले. ज्यांचे नुकसान झाले त्यांचेही अनुभव लिहिले. या सगळ्यांच्या पाठीमागं एक गोष्ट सारखीच होती. आणि ती म्हणजे नवीन काहीतरी करण्याची.. अर्थात अनेकांनी त्याचा चांगला उपयोग करून घेतला देखील.

- Advertisement -

प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे नफा आणि तोटा दडलेला असतो. त्यातून नफा होऊ द्यायचा की तोटा हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते. आज घडीला सोशल मीडियावर घडून आलेले बदल पाहता. युवक स्वतः समाजाचा फायदा कसा होईल याकडे अधिक लक्ष देत आहेत. (अपवाद वगळता) इथे व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व आहे. सरकारच्या चुका होत असतील त्यावर बोलले जाते. स्त्रियांवर होणारे अत्याचार, बालकांचे लैंगिक शोषण, आर्थिक, शैक्षणिक सामाजिक प्रश्न, सुरू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन, बेरोजगारीचा प्रश्न या सगळ्या समस्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरे शोधली जात आहेत. जिथे मुख्य मीडिया पोहोचू शकत नाही, तिथे सोशल मीडिया हेच जनसंचाराचे माध्यम होत आहे. एकूणच काय युवकांमध्ये असलेली बदलाची भूमिका प्रगतीच्या वाटचालीकडे घेऊन जात आहे. लोकशाही मार्गाने विरोध दर्शवला जातो. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला जातोय. हे सर्व अलिकडच्या काळात सोशल मीडियावर घडून येत आहे, आले आहे.

इंटरनेटच्या वापरातून आपण बर्‍याच गोष्टी शिकलो. जिथे प्रत्यक्ष जाऊन काम होत नाही तिथे आपण ऑनलाइनचा पर्याय निवडला. वेळ वाचला, पैसा वाचला आणि कामही सुरळीतपणे पार पडले. हा अनेकांचा अनुभव आहे. याचे कारण सरकार आणि खासगी कंपन्या यांनी एकत्र येऊन वेगवेगळ्या क्षेत्रातील अ‍ॅप तयार करून लोकांना घरबसल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. खरे तर ही सोशल मीडियाची क्रांती म्हणायला हरकत नाही. याची दुसरी बाजूसुद्धा महत्त्वाची आहे. ती म्हणजे आपण घराबाहेर एखादे काम करण्यासाठी जातो. त्यावेळी आजूबाजूचे वातावरण, लोक काय करत आहेत हे समजून घेता येते, प्रत्यक्ष भेटी होतात.. गप्पा गोष्टी होतात.. हे सर्व अलीकडच्या काळात विस्मृतीत जाण्याची भीती वर्तवली जातेय. काही अंशी हे खरेदेखील आहे. मी तर म्हणतो नेमकं सर्वच गोष्टी ऑनलाइन करण्यापेक्षा काही गोष्टींना ऑफलाईन पर्याय द्यावा म्हणजे त्यातूनही वेगळा आनंद मिळवता येईल. या नवीन वर्षात आपण सोशल मीडियावर सक्रिय होऊन तुमच्या मनातल्या अनेक गोष्टींना प्राधान्य देऊन सामाजिक सलोखा निर्माण करू शकता. किंवा वेगवेगळे ग्रुप तयार करून तुमच्या संकल्पना राबवू शकता..

एकामागून एक वर्ष येतात आणि निघून जातात. आयुष्याची पानेदेखील. तसेच आपण उघडत असतो. एकदाच मिळालेल्या या आयुष्याचे गीत व्हावे आणि तुमची सर्व स्वप्नं पूर्ण व्हावी यात शुभेच्छा पुन्हा एकदा या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला देतो. आणि भेटत राहु प्रत्येक सदरातून तुमच्या आवडत्या विषयासह… प्रत्येक गोष्टींचा जास्त विचार करत बसण्यापेक्षा येणार्‍या प्रत्येक दिवसात आनंदाने जगुयात.. डॉ.नदीम शाद म्हणतात त्याप्रमाणे..

हर कदम पर जो सोचेंगे थक जाएंगे
जो ना सोचेंगे वो दूर तक जाएंगे।

एका सफरची सुरुवात आनंदाने करूयात, तुमच्या वेगवेगळ्या संकल्पनांसोबत…

- Advertisement -