घरमहाराष्ट्रमुंबई-पुणे हायवेवर अपघात; वाढदिवसादिवशीच डॉक्टरवर काळाचा घाला

मुंबई-पुणे हायवेवर अपघात; वाढदिवसादिवशीच डॉक्टरवर काळाचा घाला

Subscribe

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर झालेल्या भीषण अपघात दोघांचा मृत्यू झाला असून यात एका डॉक्टर चा समावेश आहे.

मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावर झालेल्या भीषण अपघात दोघांचा मृत्यू झाला असून यात एका डॉक्टर चा समावेश आहे. लक्झरी बसने कारला पाठीमागून जोरात धडक दिली असून यात जागीच दोघांचा मृत्यू झाला आहे. डॉ. केतन खुर्जेकर आणि ज्ञानेश्वर भोसले असे मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जयेश पवार आणि प्रमोद भिलारे अशी जखमींची नावे आहेत. आज मृत डॉ. केतन खुर्जेकर यांचा वाढदिवस होता. मात्र, आजच्या दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

bus
अपघात

नेमकं काय घडलं 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून परत येत असताना गाडी क्रमांक एम. एच. १४ जी. यु. ११५८ याचे टायर पंचर झाले होते. ते चालक ज्ञानेश्वर आणि डॉ. केतन हे बदलत होते तेव्हा भरधाव वेगात आलेली लक्झरी बसने पाठीमागून कारला भीषण धडक दिली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना ओझर्डेगाव हद्दीत घडली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, डॉ. केतन यांचा अपघात मृत्यू झाला असून आज त्यांचा वाढदिवस होता म्हणून हळहळ व्यक्त केली जात आहे. ते पुण्यातील संचेती रुग्णालयात कार्यरत होते.

- Advertisement -

हेही वाचा –

शिस्तीचे वळण राजांना लागत आहे; सामनातून उदयन राजेंवर टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -