घरमहाराष्ट्र'आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या'

‘आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या’

Subscribe

मंगळवेढा तालुक्यातील ४५ गावांनी आता आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या अशी मागणी केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील ४५ गावं केवळ पावसावर अवलंबून आहेत. ४५ गावांना कोरडवाहूचा दर्जा द्या. पालकत्व स्वीकारता येत नसेल तर जगण्यासाठी तरी आम्हाला कर्नाटकमध्ये जोडा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

राज्यात आता दुष्काळाची स्थिती भयंकर होताना दिसत आहे. त्याचाच परिणाम म्हणजे मंगळवेढा तालुक्यातील ४५ गावांनी आता आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या अशी मागणी केली आहे. मंगळवेढा तालुक्यातील ४५ गावं केवळ पावसावर अवलंबून आहेत. ४५ गावांना कोरडवाहूचा दर्जा द्या. पालकत्व स्वीकारता येत नसेल तर जगण्यासाठी तरी आम्हाला कर्नाटकमध्ये जोडा, अशी जोरदार मागणी नंदेश्वर  येथील बैठकीमध्ये शेतकऱ्यांनी केली आहे. पावसानं पाठ फिरवल्यानं पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. गुरं, जनावरं, माणसं पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. पाणीप्रश्न बिकट बनल्यानंतर ४५ गावातील सरपंच पदाधिकारी आणि प्रमुख शेतकऱ्यांची नंदेश्वर येथे बैठक झाली. दरम्यान, या ४५ गावांना कोरडवाहू दर्जा मिळाल्यास शेतकरी तग धरेल. एकतर राज्य सरकारनं आमचं पालकत्व स्वीकारावं किंवा आम्हाला कर्नाटकात जाऊ द्यावं अशी निर्वाणीची मागणी या शेतकऱ्यांनी  केली आहे. तसेच यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय देखील या गावांतील शेतकऱ्यांनी घेतला आहे.

वाचा – राज्यात भीषण दुष्काळ?

राज्यात भीषण स्थिती

दरम्यान राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती आहे. मराठावाडा, विदर्भात तर दाहकता वाढत आहे. त्यात आता धरणातील पाण्यावरून देखील वाद उभे राहण्याची परिस्थिती आहे. दरम्यान, यावर्षी पावसानं ओढ दिल्यानं जगण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे सरकारनं लवकर दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहे. दरम्यान ३१ ऑक्टोबर रोजी दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राज्याला केंद्र सरकार दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन दिले आहे. ते शिर्डीमध्ये बोलत होते. दरम्यान, राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेचे देखील पुरता बोजवारा उडाल्याचे नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालातून समोर आलं आहे.

- Advertisement -

सध्याची स्थिती पाहता सरकारसमोर दुष्काळ निवारणाचा गंभीर प्रश्न उभा राहणार आहे. त्यामुळे सरकार यावर कशा रितीने मात करतं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, पावसासाठी आजा जूनचीच वाट पाहावी लागणार आहे. परतीच्या पावसानं देखील ओढ दिल्यानं बळीराजा मोठा संकटात आहे.

वाचा – दुष्काळ निवारणासाठी सर्वतोपरी मदत करू – मोदी

वाचा – पुण्यात दुष्काळी परिस्थिती कागदावरच; तर राजकिय नेते राजकारणात दंग

वाचा – दुष्काळा आडून भाजपचा प्रचार दौर्‍याचे वेळापत्रक ठरले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -