घरमहाराष्ट्रभाजपची स्वबळावर सत्ता येईल

भाजपची स्वबळावर सत्ता येईल

Subscribe

राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील आणि त्या स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी पुरेशा ठरतील, असे भाकित माजी मुख्यमंत्री आणि सेनेचे विरोधक नारायण राणे यांनी वर्तवले आहे. झालेल्या मतदानातून सेनेच्या वाट्याला ५५ हून अधिक जागा येणार नाहीत, असे राणे यांनी या प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले.

मतदानानंतर जाहीर झालेल्या मतदानोत्तर चाचणीतील आकडेवारीवर त्यांनी आक्षेप नोंदवला. हे निष्कर्ष सहमती वर्तवण्यासारखे नाहीत, असे सांगताना या निवडणुकीत भाजपला १३५ जागांवर यश मिळेल, असे राणे म्हणाले. याशिवाय अपक्षांकडूनही भाजपला चांगली मदत होईल. यामुळे भाजप सहजपणे स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असे ते म्हणाले. शिवसेनेला 55 च्या पुढे मजल मरता येणार नाही.

- Advertisement -

कणकवली लढतीवरून त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले. कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे हे 50 हजार मतांच्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेत कोणीही उठतो आणि तोंडाला येईल ते बोलत सुटतो. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक आरोपांना उत्तर द्यायला मी बांधील नसल्याचे राणे यांनी सांगितले.

दरम्यान, राणे यांच्या या वक्तव्यानंतर आगामी मंत्रिमंडळात सेनेसाठीची वाटचाल खडतर असेल, असे अनुमान काढले जाऊ लागले आहेत. युतीबाबत भाजपकडून आजवर थेट वक्तव्य कोणीही केले नव्हते. इतकेच काय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनाही युतीबाबत न बोलण्याची तंबी देण्यात आली होती. तेव्हापासून एकटे मुख्यमंत्री फडणवीसच याबाबत वाच्यता करायचे. आता सेनेचे ठाम विरोधक असलेल्या नारायण राणे यांनी स्वबळाची भाषा केल्याने सेनेपुढे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -