Coronavirus – ‘त्या’ दाम्पत्याची मुलगी, कॅबड्रायव्हर आणि सहप्रवासी ही करोनामुक्त

Pune
coronavirus in world over one lakh coronavirus patients recovered worldwide
१ लाख रुग्णांनी केली करोनावर यशस्वी मात

राज्यात करोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. देशभरातील सर्वाधिक करोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात आढळले आहेत. यात समाधानाची बाब म्हणजे राज्यात करोनाबाधित म्हणून नोंद झालेल्या पहिल्या दाम्पत्याला काल डिस्चार्ज मिळाला आहे. हे दाम्पत्य पुण्यातील नायडू रुग्णालयात उपचार घेत होते. पण त्यांची आता करोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने ते व्हायरस फ्री झाले आहे. नायडू रुग्णालयातून त्यांना रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आलं. या पाठोपाठ आणखी तिघे करोनामुक्त झाले आहेत. त्यांना आज म्हणजे  गुरुवारी घरी सोडण्यात आले आहे. पहिल्या करोनाग्रस्त दाम्पत्याची मुलगी, कॅबड्राईव्हर आणि सहप्रवासी यांना आज डिश्चार्ज देण्यात आला.

दुबईहून परतल्यानंतर या दाम्पत्याला करोनाची लागण झाल्यामुळे ९ मार्च रोजी होळीच्या दिवशी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर चौदा दिवसांनी त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. त्यावेळेस त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. मग दोन ते तीन दिवसांनी पुन्हा नमुने घेण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा झाली आणि करोनाची त्यांची दुसरी चाचणी देखील निगेटिव्ह आली.

तसंच या दाम्पत्याच्या संपर्कात आल्याने त्यांच्या मुलीला आणि वाहन चालकाला करोनाची लागण झाली होती. आज दाम्पत्याच्या मुलीच्या पहिल्या चाचणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तसंच वाहन चालकाच्या दुसऱ्या करोनाचा चाचणी रिपोर्टही निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.


हे ही वाचा – CoronaVirus: राज्यातील पहिल्या करोनाबाधित दाम्पत्याला डिस्चार्ज!


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here