घरअर्थजगतपुढची पाच-दहा वर्ष आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तकं लिहत रहा - उद्धव ठाकरे

पुढची पाच-दहा वर्ष आमच्या अर्थसंकल्पावर पुस्तकं लिहत रहा – उद्धव ठाकरे

Subscribe

देवेंद्रजी संसदेत गेले तर मुनगंटीवारांना आनंद होईल - अजित पवार देवेंद्रजी तुम्ही साहित्यीक व्हा - नान पटोले

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देताना कोपरखळी मारली. पुढची पाच-दहा वर्ष आमच्यासाठी अशीच अर्थसंकल्पिय पुस्तके लिहीत रहा, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. या प्रकाशन सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देताना म्हणाले की, “आमच्या पहिल्या अर्थसंकल्पाआधी तुम्ही पुस्तक लिहीले आहे. पुढची पाच-दहा वर्षे अशीच पुस्तके आमच्या अर्थसंकल्पावर लिहीत रहा. त्यामुळे आम्हालाही कळेल की, आमच्या काय उणीवा राहिल्या आहेत. आणि त्या उणीवा सुधारत सुधारत पुढे जात राहू.”

- Advertisement -

हेही वाचा – करोना नष्ट करायचा आहे, मग करा ‘जय श्री राम’चा जयघोष

देवेंद्र फडणवीसांच्या पुस्तकाबद्दल बोलताना असे पुस्तक यापूर्वी कोणी लिहिले नव्हते, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यासह सर्वप्रथम हे पुस्तक मीच वाचेन, असे देखील म्हणाले. “आपला कार्यक्रम दुसऱ्यांच्या पैशाने कसा करावा हे आज शिकलो. मी हा कधी आयुष्यात विचार केला नव्हता की मी अशा विषयावर कधी भाषण करेन पण हा प्रसंग तुमच्यामुळे माझ्यावर आला. मला कळावे म्हणून त्यांनी सोप्या भाषेत अर्थ संकल्प हे पुस्तक लिहिले आहे.” नोट बंदी हा विषय अर्थसंकल्पामध्ये यायला हवा होता की नको होता, असा सवाल देखील मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी उपस्थित केला.

devendra fadnavis book publishing
महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

सामान्य जणांना बजेट समजलं पाहिजे म्हणून हे पुस्तक लिहिलं – फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आपल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलताना सामान्य जणांना बजेट समजला पाहिजे म्हणून हे पुस्तक लिहिल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

“अर्थ संकल्प अनेकांना क्लिष्ट वाटत असतो. जेव्हा तो अर्थ संकल्प सदस्यांना मिळतो तेव्हा ते बॅग भरून पुस्तके घेऊन जातात. मात्र, पुस्तकांचे नेमके काय करायचे हे त्यांना माहीत नसते. २००५ साली ‘अर्थ संकल्प म्हणजे काय?’ हे पुस्तक मी लिहिले होते. अनेकांनी त्या पुस्तकाचा फायदा घेतला. आता काही कायद्यामध्ये बदल झाले. बजेटमध्ये बदल झाले. त्यामुळे नव्या संकल्पनासहित हे पुस्तक लिहावे असे मला वाटले. ४० मिनिटात हे पुस्तक वाचता आले पाहिजे. अर्थ संकल्पची कार्यपद्धती आणि रचना समजली तर त्याचे विश्लेषण करता येते. माझ्या पेक्षा माझ्या पत्नीला पगार जास्त मिळतो. म्हणून मला तो लक्षात राहतो. हे पुस्तक मी हिंदी आणि इंग्रजीमध्ये देखील काढणार आहे. अर्थ संकल्प समजला तर आपल्याला अजित दादांना जास्त त्रास देता येईल,” असे देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -