घरताज्या घडामोडीदिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र करोना कक्ष

दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र करोना कक्ष

Subscribe

जिल्हा परिषद : उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी नोडल अधिकारी

नाशिक : जिल्हा परिषद अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी जिल्हास्तरीय करोना कक्ष स्थापन केला आहे. जिल्हा नोडल अधिकारी म्हणून प्रभारी समाज कल्याण अधिकारी रविंद्र परदेशी यांची नियुक्ती केली आहे. तसेच तालुकास्तरावर गट विकास अधिकारी यांना तालुका नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. जिल्हयात 16 हजार 226 दिव्यांग असून महापालिका क्षेत्रात 7 हजार 215 दिव्यांग आहेत. जिल्हास्तरिय दिव्यांग कक्षामध्ये 8 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. प्रबोधिनी ट्रस्ट संचलित विद्यामंदीर विद्यालय, जुनी पंडीत कॉलनी, शरणपुर रोड या शाळेमध्ये हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून अधिक माहितीसाठी 0253-2579716 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा समाजकल्याण अधिकारी रविंद्र परदेशी यांनी केले आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -