घरमहाराष्ट्रपुण्यात पेस्ट कंट्रोलचे दोन बळी

पुण्यात पेस्ट कंट्रोलचे दोन बळी

Subscribe

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी पुण्यातील आनंदनगर येथे एका ९ वर्षाच्या चिमुरड्याचा पेस्ट कंट्रोलमुळे मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ढेकूण घालवण्यासाठी पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. पेस्ट कंट्रोल करण्यात आलेल्या खोलीतच दोघे तरुण झोपले होते. मात्र सकाळी दोघेही मृतावस्थेत आढळल्याचे समोर आले आहे. यातील एक तरुण बुलढाणा येथील असून दुसरा तरुण पुण्यात राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून या तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

नेमके काय घडले?

पुण्यातील भारती विद्यापीठाच्या महाविद्यालयामध्ये हे दोन तरुण काम करत होते. कॅन्टीन मालकाने दोघा तरुणांना राहण्यासाठी एक खोली दिली होती. ढेकणांचा त्रास होत असल्याने त्यांच्या खोलीत पेस्ट कंट्रोल करण्यात आले होते. पेस्ट कंट्रोल केल्यामुळे हे दोघेही आपवल्या मित्राच्या घरी तीन दिवस राहण्यासाठी गेले होते. नंतर ते पुन्हा आपल्या खोलीवर आले. सकाळी वेळ होऊनही दोघे तरुण कामावर न आल्याने कॅन्टीन मालकाने खोलीत जाऊन पाहणी केली असता दोघे मृतावस्थेत आढळले. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. पेस्ट कंट्रोलचा प्रभाव कमी झाला नसल्याने या दोन तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -

वाचा – पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे चिमुरड्याचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -