घरमहाराष्ट्रकाँग्रेसची विचारधारा आणि राज ठाकरेंची विचारधारा वेगवेगळी - नितीन गडकरी

काँग्रेसची विचारधारा आणि राज ठाकरेंची विचारधारा वेगवेगळी – नितीन गडकरी

Subscribe

काँग्रेसची विचारधारा आणि राज ठाकरेंची विचारधारा वेगवेगळी असून राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या विचारांमध्ये देखील ताळमेळ नाही. त्यामुळेराज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती,' असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.

‘काँग्रेस आणि राष्ट्रवादीची विचारधारा जवळपास समान आहे. परंतु काँग्रेसची विचारधारा आणि राज ठाकरेंची विचारधारा वेगवेगळी असून राज ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या विचारांमध्ये देखील ताळमेळ नाही. त्यामुळे विचारांच्या आधारावर युती करावी, राज ठाकरेंनी राष्ट्रवादीची साथ द्यायला नको होती,’ असे वक्तव्य केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे.

राज ठाकरेंशी माझे चांगले संबंध

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत शरद पवार, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या मुदद्यांवर भाष्य केले आहे. ‘राज ठाकरेंचे विचार सुस्पष्ट होते. मी मैत्री केलेल्यांचा हात कधी सोडत नाही. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. निवडणुकीत काय बोलावे ते त्यांनी ठरवावे. त्याचप्रमाणे बाळासाहेबांचे पुत्र उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर देखील तितकेच प्रमे आहे. तसेच भाजपा आणि शिवसेना युती ही हिंदुत्वाच्या आधाराव आहे’, असे देखील ते म्हणाले आहेत.

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस राज्य उत्तम चालवत आहेत

जे जगात नाही ते नागपुरात करण्याचा प्रयत्न आहे. तसेच नागपूरकरांनी सेवेची संधी दिली आहे. आजपर्यंत नागपुररचा विकास आणि भविष्यासाठी काम केले आहे. त्याचप्रमाणे मी जात, पंथ, भाषा आणि पक्ष पाहून काम केले नाही आणि करणारही नाही. गरिबाच्या विकासासाठी राजकारण करेन. अरविंद केजरवाली माझे चांगले मित्र आहेत. जिंकण्याची साशंकता असल्याने शरद पवारांनी मढ्यातून माघार घेतली असावी. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस राज्य उत्तम चालवत आहेत. विचारांची लढाई असली पाहिजे, राहुल गांधीनी टीका करताना पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, असा सल्लाही गडकरींनी राहुल गांधींना दिला आहे.


वाचा – नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले लोकसभा रिंगणात

- Advertisement -

वाचा – मी जे बोलतो ते करुन दाखवतो – नितीन गडकरी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -