घरमुंबईरस्त्यातील खड्ड्यांविरोधात भारतीय काँग्रेस करणार आंदोलन

रस्त्यातील खड्ड्यांविरोधात भारतीय काँग्रेस करणार आंदोलन

Subscribe

रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविण्यासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासनाने करोडो रुपयांचा चुराडा केला. मात्र, अद्याप हे खड्डे बुजवण्यात आले नसल्यामुळे भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपा मुख्यल्यासमोर धरणे आंदोलन करणार आहे.

शहरातील रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविण्यासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासनाने करोडो रुपयांचा चुराडा केला. मात्र, अजूनही जवळजवळ सर्वच रस्ते खराब आणि धोकादायक अवस्थेत असून त्यामुळे अनेक नागरिक मृत्युमुखी आणि जखमी झाले आहेत. या घटनांना मनपा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप भारतीय काँग्रेसचे जिल्हा सचिव रोहित साळवे यांनी केला आहे. याच संदर्भात मनपा प्रशासनाचा निषेधार्थ येत्या शुक्रवारी मनपा मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे साळवे यांनी सांगितले आहे.

रस्त्यांची अवस्था बिकट

उल्हासनगर शहराचे क्षेत्रफळ अवघ्या १३ वर्ग किमी असून इतर महानगरपालिकांच्या दृष्टीने ही लहान महानगरपालिका आहे. शहरातील एकूण रस्त्यांची लांबी ६१ .९४ किलोमीटर आहे आणि गेल्या पाच वर्षांमध्ये या रस्त्यांमधील खड्डे बुजविण्यासाठी तब्बल ३६ करोड ३४ लाख खर्च करण्यात आले आहेत. तरी देखील शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. गेल्या १० वर्षात रस्ते अपघातात १६४ जण मृत्युमुखी पडले असून ५६० जण जखमी झाले आहेत. यामध्ये खड्ड्यांमुळे मृत्यू आणि जखमी झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

- Advertisement -

करोडो रुपयांचा चुराडा

महापालिकेकडून खड्डे बुजविण्याचा कंत्राट ठराविक ठेकेदारांनाच दिला जातो. यासाठी निविदा मागविण्यात येतात. परंतु, निविदा मधील अटी आणि शर्थीप्रमाणे काम होत नाही. ठेकेदारांच्या कामाची तपासणी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे गंभीरपणे होत नाही. शिवाय या ठेकेदारांच्या कागदपत्रांची तपासणी देखील केली जात नसल्यामुळेच रस्त्यांची दुर्दशा झाली असल्याचा आरोप रोहीत साळवे यांनी केला आहे. या संदर्भात मनपा प्रशासनाकडे वारंवार विनंती अर्ज देऊनही त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपा मुख्यल्यासमोर येत्या १९ जुलै रोजी धरणे आंदोलन करणार असल्याचे साळवे यांनी पत्रकारांना सांगितले आहे.


हेही वाचा – मुंबईतल्या खड्ड्यांची नोंद गिनीज बुकात होणार?

- Advertisement -

रस्त्यांवर असलेले खड्डे बुजविण्यासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासनाने करोडो रुपयांचा चुराडा केला. मात्र, अद्याप हे खड्डे बुजवण्यात आले नसल्यामुळे भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मनपा मुख्यल्यासमोर धरणे आंदोलन करणार आहे.


हेही वाचा – अभियंत्यावर चिखलफेकीनंतर नितेश राणे रुग्णालयात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -