CES 19: गुंडाळून ठेवा ‘हा’ भन्नाट TV

६५ इंचाच्या या टी.व्ही.वर आपण नॉर्मल टेलिव्हीजनप्रमाणेच सगळे कार्यक्रम तसंच चित्रपट पाहू शकतो. मात्र, याचं वैशिष्ट्यं म्हणजे काम झाल्यानंतर तुम्ही हा टीव्ही गुंडाळून ठेवू शकता.

Mumbai
CES 2019 : lG lcunched rollable tv
सौजन्य- सोशल मीडिया

तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘LG’ या नामवंत कंपनीने जगातील पहिल्या रोलेबल टी.व्ही.चा शोध लावला आहे. अमेरिकेच्या लास वेगासमध्ये सध्या सुरु असलेल्या CES 2019 (कंझ्युमर्स इलेक्ट्रॉनिक शो) मध्ये एलजीने हा अनोखा गुंडाळता येणारा टीव्ही सादर केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गुंडाळता येणाऱ्या या फोल्डेबल टेलिव्हीजनच्या विक्रीला याचवर्षी सुरुवात होणार आहे. मात्र, या भन्नाट टीव्हीच्या किंमतीबद्दल अद्याप कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. उपलब्ध माहितीनुसार, ६५ इंचाच्या या टी.व्ही.वर आपण नॉर्मल टेलिव्हीजनप्रमाणेच सगळे कार्यक्रम तसंच चित्रपट पाहू शकतो. मात्र, याचं वैशिष्ट्यं म्हणजे काम झाल्यानंतर तुम्ही हा टीव्ही एखाद्या चटईप्रमाणे गुंडाळून ठेवू शकणार आहात. गेल्यावर्षीच्या कंझ्युमर्स इलेक्ट्रॉनिक शोमध्ये या जबरदस्त टीव्हीचा प्रोटोटाईप सादर करण्यात आला होता. अखेर यावर्षी या टीव्हीचं फायनल मॉडेल सादर करण्यात आलं असून, याच वर्षाच्या अखेरीला त्याची विक्री सुरु होणार आहे.

कंपनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ग्राहक हा टी.व्ही. ३ मोडमध्ये वापरु शकतात. त्यापैकी फूल व्ह्यूमध्ये तो संपूर्णपणे दिसू शकतो. लाईन व्ह्यूमध्ये त्याचा बहुतेक भाग स्पीकर बॉक्सच्या आत राहील तर थोडा वर राहील. म्युझिक, क्लॉक, फ्रेम, होम डॅशबोर्ड आणि मूडसारखे आयकॉन तुम्हाला त्यावर दिसतील. तिसऱ्या झीरो व्ह्यू  मोडमध्ये टी.व्ही. पूर्णपणे स्पीकर बॉक्समध्ये जाईल. अर्थात या स्थितीतही टी.व्ही.युजर गाणी ऐकू शकतात. हा टी.व्ही. आम्ही लोकांच्या गरजेनुसार बनवला आहे, असे कंपनीने म्हटले आहे. गुंडाळून ठेवता येणारा हा अनोखा टी.व्ही. ग्राहकांच्या हमखास पसंतीस उतरेल, अशी खात्री एलजी कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.


वाचा : ‘फोल्ड’ होणारा स्मार्टफोन; पाहा भन्नाट फिचर्स

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here