घरटेक-वेकजूनमध्ये येणार पहिली इंटरनेट कार; आवाजाने देता येणार 'या' कारला आदेश

जूनमध्ये येणार पहिली इंटरनेट कार; आवाजाने देता येणार ‘या’ कारला आदेश

Subscribe

तंत्रज्ञानातील Cisco, Unlimit आणि Microsoft यासारख्या भागीदारांनी मिळून अशी सिस्टीम एकत्रितरित्या तयार केले आहे.

एमजी मोटर (मॉरिस गॅरेज) इंडियाने आज मंगळवारी आपल्या येणाऱ्या SUV MG Hectorचे केबिन फीचर्स जाहीर केले आहे. येणाऱ्या MG Hectorमध्ये अद्यावत कनेक्टिविटी सिस्टीम सोबतच, ‘i-Smart नेक्स्ट-जनरेशन सिस्टीम’ देण्यात येईल. ही एक इंटीग्रेटेड सोल्यूशन सिस्टीम असून ज्यामध्ये सॉफ्टवेअर, हार्डवेअर, कनेक्टिव्हिटी, सर्व्हिस आणि अॅप्सचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

तंत्रज्ञानातील Cisco, Unlimit आणि Microsoft यासारख्या भागीदारांनी मिळून अशी सिस्टीम एकत्रितरित्या तयार केले आहे. यामध्ये, i-Smart कनेक्टिविटी सिस्टीम अॅडवान्स टेक्नोलॉजी, स्मार्ट अॅप, बिल्ट-इन-ऐप्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI), स्मार्ट फिचर्स, वॉईस असिस्टंट आणि इन्फोटेंमेंट सारख्या वैशिष्ट्यांसह येणार आहे. MG Hector या इंटरनेट कारची विक्री या वर्षातील जून महिन्यात सुरू केली जाईल.

- Advertisement -

i-Smart नेक्स्ट-जनरेशनसाठी कारमध्ये ब्रेन म्हणून १० इंचचा टचस्क्रीन युनिट असणार आहे. या डिस्प्लेची डिझाइनिंग वर्टिकल इंटरफेस स्वरूपात असेल. याद्वारे, कारचालकाला संपुर्ण कारच्या सिस्टीमला आवाजाने आदेश किंवा टच करून नियंत्रित करता येणार आहे. ही स्मार्ट सिस्टीम M2M सिम असल्याने कार कनेक्ट राहण्यास मदत होईल. हे तंत्रज्ञान Cisco आणि Airtelने एकत्रितरित्या तयार केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ही सिस्टीम 5G आहे. एंबडेड सिम कनेक्टिविटीच्या सहाय्याने यूजर्स रियल-टाइम सॉफ्टवेअर, एन्टरटेंमेंट कन्टेंट आणि अॅप्स अपडेट्स स्वीकारू शकणार आहे.

हे आहेत काही वैशिष्टे

  • रिमोट व मोबाईल अॅपद्वारे कारवर नियंत्रण मिळवता येणे शक्य
  • आर्टिफिशियल इंटेलिजेंस, मशिन लर्निंग कॅपेसिटी उपलब्ध
  • रिमोट ट्रॅकिंग, ऑटोमॅटिक इमरजेन्सी रिस्पॉस (ई कॉल), जिओ फॅसिंग अपडेट मॅप सुविधा
  • गाण्याचे अॅप
  • इंफोटेनमेंट सिस्टीमच्या अॅप्पल कार प्ले, अॅन्डरॉईड ऑटो आणि मिरर लिंकसह कनेक्ट करता येणे शक्य
  • ३६० डिग्री पार्किंग कॅमरा, पॅनारोमिक सनरूफ, लॅदर सीट आणि क्रूज कंट्रोल
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -