घरटेक-वेकTik Tok ला टक्‍कर देण्यासाठी Instagram कडून स्पेशल App लाँन्च!

Tik Tok ला टक्‍कर देण्यासाठी Instagram कडून स्पेशल App लाँन्च!

Subscribe

इंस्‍टाग्रामच्या या सर्व्हिमध्ये यूजर्सला टिकटॉक सारखेच अनेक फिचर्स मिळणार

भारतात टिक टॉकवर बंदी आल्यानंतर युजर्स आता नवा पर्याय शोधत आहेत. बर्‍याच भारतीय अॅप्सनी देखील टिक टॉकची जागा घेतली आहे.तर आता इंस्‍टाग्राम देखील टिक टॉकला नवीन पर्याय म्हणून नवं सर्व्हिस Reels फिचर लॉन्च केले आहे. इंस्‍टाग्रामच्या या सर्व्हिमध्ये यूजर्सला टिकटॉक सारखेच अनेक फिचर्स मिळणार आहेत. फेसबुक गेल्‍या काही दिवसांपासून भारतात या फिचरचे टेंस्‍टिंग करत आहे. आता हे फिचर कंपनीने भारतात लॉन्च केले आहे. टिकटॉक बॅन केल्‍या नंतर अनेक ॲप्स भारतीय बाजारामध्ये लोकप्रिय झाले आहेत. अशामध्ये इंस्‍टाग्रामचे हे फिचर्स टिकटॉक चाहत्‍यांच्या पसंतीस उतरू शकते.

इंस्‍टाग्रामचे हे नवे फिचर या ॲपमध्येच युजर्सना मिळणार आहे. यासाठी यूजरला स्‍वतंत्रपणे ॲप डाऊनलोड करण्याची गरज नाही. हे फिचर जगातील काही देशांमध्ये पहिल्‍यापासूनच उपलब्‍ध आहे. मात्र आता हे फिचर भारतीय यूजर्ससाठी देखील उपलब्‍ध करण्यात आले आहे.

- Advertisement -

इंस्‍टाग्राम रिल्‍स मध्ये असणारे फिचर्स…

  • इंस्‍टाग्रामच्या रिल्‍स फिचरव्दारे यूजर्सना टिकटॉक पध्दतीने १५ सेकंदांचे व्हिडिओ तयार करता येईल
  • व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये देखील बदल करणं शक्य होणार आहे.
  • टिकटॉक सारखेच व्हिडिओचे स्‍पीड कंट्रोल करू यामध्ये करणं शक्य असेल.
  • या सर्व्हिमध्ये टिकटॉकचा ‘Duet’ फिचरही यूजर्सला मिळणार आहे.
  • पूर्ण व्हिडिओ बनवल्‍यानंतर आपल्‍या इंस्‍टाग्राम स्‍टोरीजमध्ये तो व्हिडिओ यूजर्सना शेअर करता येणार आहे.
  • या सोबतच यूजर आपल्‍या मित्रांना हा व्हिडिओ डायरेक्‍ट पाठता येणार आहे.

टिकटॉकवर सरकारकडून बंदी आणल्‍यानंतर भारतीय ॲप्सची लोकप्रियता खूप वाढली आहे. यादरम्यान मित्रो, चिंगारी यासारख्या भारतीय ॲप्सना मोठ्या प्रमाणात डाऊनलोड करण्यात येत आहे. भारत आणि चीनमधील सीमेवर सुरू असलेल्‍या तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने टिकटॉक सहीत ५९ ॲप्सवर भारतात बंदी घातली आहे.

Lasso ॲप आता बंद होणार

फेसबुकचे टिकटॉकला टक्‍करवाले Lasso हे ॲप आता बंद होणार आहे. फेसबुकने टिकटॉकच्या धर्तीवर हे ॲप २०१८ मध्ये लॉन्च केले होते. या ॲपच्या यूजर्सना फेसबुकने एक मॅसेज पाठवून १० जुलैपर्यंत ही सर्व्हिस बंद होणार असल्‍याचे सांगितले. या आधी यूजर्स आपला डेटा, व्हिडिओ सेव्ह करू शकतात. फेसबुकची ही सर्व्हिस जगातील अनेक देशांमध्ये उपलब्‍ध होती. यामध्ये कोलंबिया, यूएस, मेक्‍सिको, अर्जेंटीना, चिली, पेरू, पनामा, कॉस्‍टा रीका, एल सलवाडोर, उरूग्‍वे आणि एक्‍वाडोर या देशांचा समावेश आहे.


सुशांतची हत्याच झाली; आत्म्याशी बोलल्याचा पॅरानॉर्मल एक्स्पर्टचा दावा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -