घरटेक-वेक'या' कारणावरुन फेसबुक बनला चिंतेचा विषय

‘या’ कारणावरुन फेसबुक बनला चिंतेचा विषय

Subscribe

भारतीय फेसबुक युजर्सचे अकाउंट हॅक होत आहेत. मोबाईल अॅप वापरतांना थर्ड पार्टी अॅपमध्ये फेसबुकद्वारे लॉगइन केल्यामुळे अकाउंट हॅकिंगचा धोका वाढला आहे.

वाढत्या इंटरनेटच्या वापरामुळे भारतात फेसबुक वापरणाऱ्यांची संख्याही वाढते आहे. भारतीय फेसबुक युजर्सचे अकाउंट हॅक झाल्याच्या घटनांमुळे फेसबुकवर माहिती टाकणे धोक्याचे झाले आहे. इतर अॅपमध्ये लॉगइन करण्यापूर्वी फेसबुक आयडी पासवर्ड टाकणे आवश्यक असल्याने फेसबुक अकाउंट हॅक होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे भारतातील ५० दशलक्ष फेसबुक युजर्सचे अकाउंट हॅक झाले आहेत. या युजर्सचा खाजगी डेटा चोरून इतर कपन्यांना विकल्या जातो. त्यामुळे देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. मोबाईल अॅप बनवणाऱ्या कंपन्या भारताबाहेर असल्याने आपल्या देशातील डेटा इतर देशात वापरला जात आहे. अॅपद्वारे मिळणाऱ्या डेटाचा वापर नियंत्रणात येत नसल्यामुळे हा एक चिंतेचा विषय बनला आहे.

‘या’ अॅप पासून रहा सावधान

बरेचसे युजर्स स्मार्टफोन्सवर फेसबुक वापरतात. याचबरोबर स्विगी, झोमॅटो, बिग बास्केट, हॉटस्टार, टिंडर, नियाका, सोनीएलव्ही, रेंटोमोजो, फ्रेशमेनू, चाय पॉइंट, क्वारा, स्नॅपचार्ट, हेल्थीमी आणि डॉमिनोज अशा थर्ड पार्टी अॅपमध्ये फेसबुक अकाउंटवरुन लॉगइन करावे लागते. थर्डपार्टी अॅप असल्यामुळे या कंपन्यांनाही फेसबुकवरील डेटा जातो. अशा वेळी एखादे अॅप हॅक झाल्यास याचा फटका त्या युजर्सलाही पडू शकतो. दरम्यान फेसबुकने यासंबधीत माहिती युएस. लॉ एनफोर्समेंट विभागाला दिली आहे.

- Advertisement -

डेटा हॅकींगकडे लक्ष देणे हे फेसबुक इंडियाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजित मोहन यांच्या समोर एक मोठ आव्हान आहे. मोहन यांना मागील आठवड्यातच या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. या पूर्वी ते ‘हॉट स्टार’ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. फेसबुकद्वारे भारताला अद्याप पुरेशी माहिती पोहचवली गेली नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे. हॅक झालेल्या अकाउंट्सची माहिती कुठे वापरल्या गेली याबद्दल अजूनही कंपनीने मौन पाळलं आहे. दरम्यान युजर्सच्या अकाउंटमधून नाव, लिंग, फोटो, आणि लोकेशन याबद्दल माहिती हॅकर्स सहज मिळवू शकतात.

सायबर सुरक्षा आणि गोपनीयता संशोधक डॉ. लुकार ऑसेजनिक यांनी हॅकिंग संबधीतील संभाव्य व्यापक परिणामाबद्दल चेतावनी दिली आहे. “फेसबुकद्वारे लॉगइन होणाऱ्या थर्ड पार्टी अॅपवर बंधन घालणे आवश्यक आहे. यामुळे युजर्सच्या अकाउंटवर हॅकर्सपूर्ण ताबा मिळवू शकतात.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -