घरट्रेंडिंग'राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत'

‘राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत’

Subscribe

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत अशी मागणी सध्या नेटकरी करत आहेत.

सध्या राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटला आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकासआघाडी नेते उद्धव ठाकरे आज शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या महाशपथविधी सोहळा संध्याकाळी ६.४० पार पडणार आहे. तब्बल २० वर्षांनंतर शिवसेनेचा पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी शिवाजी पार्कवर सुरू आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याची तयार सुरू आहे. मात्र दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री अजित पवार व्हावेत, अशी मागणी नेटकरी करत आहेत. #AjitPawarforCM सध्या हे हॅशटॅश ट्विटरवर ट्रेंड होत आहे. नेटकरी या हॅशटॅगचा वापर करून हास्यास्पद असे मीम्स शेअर करत आहे. तसंच #AjitPawarforCM हे हॅशटॅश ट्विटरवर टॉप ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. पाहा नेटकरी काय म्हणाले….

- Advertisement -

- Advertisement -

राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा जरी संपला असला तरी अजूनही उपमुख्यमंत्री पदाचा तिढा कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील आणि अजित पवार ही दोन नावं उपमुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री पदी जयंत पाटील कि अजित पवारांची निवड केली जाते, याकडे सगळ्याचं लक्ष लागू राहिलं आहे.


हेही वाचा – अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर ट्विटरवर मीम्सचा पाऊस


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -