घरट्रेंडिंगअटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

Subscribe

अटल बिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज राज घाटावरील राष्ट्रीय स्मृती स्थळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यांच्या मानस कन्या नमिता भट्टाचार्य यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला.

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे काल निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. वाजपेयी यांच्या पार्थिवावर आज दिल्लीच्या राजघाटावरील राष्ट्रीय स्मृतीस्थळ येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वाजपेयी यांची मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी मुखाग्नी दिला. यावेळी राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण आडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि वायुदल, नौदल, भूदलांचे प्रमुख यावेळी हजर होते. या मंडळींनी वाजपेयींनापुष्पचक्र अर्पण केले. तसेच, त्यांना ३०० जवानांनी अखेरची मानवंदना दिली. अनेक पक्षांचे नेते, भाजप कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. वाजपेयींच्या निधनानंतर केंद्र सरकारने देशभरात सात दिवसांचा दुखावटा जाहीर केला आहे.

वाजपेयी यांना निरोप देताना सगळ्यांचेच डोळे भरून आले होते. त्यांच्या अस्थिंचे विसर्जन १९ ऑगस्ट रोजी हरिद्वार येथे करण्यात येणार आहे. अटलजी ११ जूनपासून दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. तसेच त्यांचे एकच मूत्रपिंड कार्यरत होते. मागील गेल्या मंगळवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणी अखेर गुरुवारी संध्याकाळी त्यांचे निधन झाले.

- Advertisement -

अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन

- Advertisement -

वाजपेयींवर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

 

मानसकन्या नमिता भट्टाचार्य यांनी दिला वाजपेयींना मुखाग्नी

स्मृतिस्थळावर पुरोहितांकडून मंत्रोच्चारात सुरू

LIVE : भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात | पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्ययात्रेत सहभागी | #MyMahanagar #atalbiharivaajpayee #AtaljiAmarRahen

Posted by My Mahanagar on Friday, August 17, 2018

वाजपेयींवर थोड्यात वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत.

अटलजींचे पार्थिव राजघाटावर दाखल झाले आहे.

अटलजी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

भूतान चे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी वाहिली अटलजींना आदरांजली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी वाहिली अटलजींना आदरांजली.

अटलजींचे महत्व खूप मोठं होत. त्यांचा भारतात महत्वाचे स्थान आणि आदर होता. -भारतातील ब्रिटीश उच्चायुक्त डॉ. डोमिनिक असक्विथ

मी २००६ ला त्यांच्याशी भेटलो होतो. ते एक प्रखर वक्ते होते. आपले वक्तव्य, भाषणे आणि कवितेतून त्यांनी नेहेमीच सर्वांना प्रेरणा दिली आहे. – चित्रपट निर्माते मधुर भांडारकर

बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्दुल हसन महमूद यांनीही वाहिली आदरांजली.

भाजपचे जेष्ठ नेते आणि अटलजींचे जवळचे मित्र लालकृष्ण आडवाणी यांनी वाहिली आदरांजली.

 


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचे अंत्यदर्शन घेतले


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपच्या मुख्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांचे अंतिम दर्शन घेतले


भाजपच्या मुख्यालयात सकाळी भाजपचेे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी श्रद्धांजली वाहिली

 

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचे काल संध्याकाळी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यानंतर संपुर्ण देशभरात शोककळा पसरली. वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेले २ महिने त्यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. पण त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती. त्यांना काही दिवसांपूर्वी व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. अखेर आज संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने ‘राजकारणातील विद्यापीठ’ हरपले, अशीच प्रतिक्रिया उमटत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -