घरट्रेंडिंगआजच्या गुगल डुडलमध्ये ही बाहुली का दिसतेय? वाचा:

आजच्या गुगल डुडलमध्ये ही बाहुली का दिसतेय? वाचा:

Subscribe

ख्यातनाम जर्मन चित्रकार, मूर्तीकार आणि कोरिओग्राफर ऑस्कर श्लेमर(Oskar Schlemmer) यांची आज अर्थात ४ सप्टेंबर रोजी १३०वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलने खास त्यांच्याच शैलीतून डुडल बनवून श्रद्धांजली दिली आहे.

ख्यातनाम जर्मन चित्रकार, मूर्तीकार आणि कोरिओग्राफर ऑस्कर श्लेमर(Oskar Schlemmer) यांची आज अर्थात ४ सप्टेंबर रोजी १३०वी जयंती. त्यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलने खास त्यांच्याच शैलीतून डुडल बनवून श्रद्धांजली दिली आहे. ‘ट्रायडिश बॅलेट’(Triadisches Ballett) या त्यांच्या नृत्यप्रकारासाठी त्यांना विशेष करून ओळखलं जातं. या प्रकारामध्ये स्टेजवर उभ्या असलेल्या एखाद्या कलाकाराला साध्या पोजमधून भौमितीय अर्थात Geometrical आकारात रुपांतरीत करण्यात येतं. असं करण्याचं त्यांचं कसबच त्यांना जगप्रसिद्ध करून गेलं. याशिवाय स्लेट डान्स प्रकारामध्ये कलाकारांना विविध फॉर्मेशनमध्ये उभं करून कलात्मक पद्धतीने त्यांच्या हालचालींमधून एक नाट्य उभं करण्याची त्यांची हातोटी विशेष लोकप्रिय ठरली होती. ४ सप्टेंबर १८८८ रोजी त्यांचा जर्मनीतील स्टेटगर्टमध्ये जन्म झाला होता.

Triadisches Ballett
ट्रायडिश बॅलेट

‘ट्रायडिश बॅलेट’ या नृत्य प्रकारामध्ये ३ डान्सर्स, १८ प्रकारच्या वेशभूषा बदलत १२ प्रकारच्या स्टेप्स करताना दिसतात. त्यांच्या लीलया होणाऱ्या नृत्याविष्कारातून श्लेमर यांचं कसब प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असे.

- Advertisement -
oskar schlemmer
ऑस्कर श्लेमर

गुगलने बनवलेल्या डुडलमध्येही श्लेमर यांच्या ‘ट्रायडिश बॅलेट’ या जगप्रसिद्ध नृत्यप्रकाराच्या छटा दिसू शकतात. यामध्ये सर्वात लोकप्रिय ठरलेली भौमितीय आकारातली प्रातिनिधिक बाहुली डुडलच्या मधोमध दिसत आहे. त्याशिवाय या नृत्यप्रकारातील इतर भौमितीय आकृत्याही या डुडलवर दिसू शकतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -