घरात लपून बसला होता भला मोठा किंग कोब्रा; पहा भयानक व्हिडीओ

king cobra rescued from a house at nainital terrifying video is going viral

आपण कोब्रा किंवा इतर कोणताही साप पाहून घाबरत असाल तर हा व्हिडीओ पाहिला तर अंगावर शहारे येतील. उत्तराखंडमधील एका घरात मोठा किंग कोब्रा लपून बसला होता. वन विभागाच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमने नैनीतालमधील घरातून किंग कोब्रा पकडला. हा किंग कोब्रा टेबलच्या खाली लपलेला होता. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ भारतीय वन सेवा अधिकारी आकाश कुमार वर्मा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये हे कोब्रा टेबलाखाली दिसत आहे. कोब्राला पकडत जंगलात सोडून देण्यात आलं. आकाश यांनी ११ ऑगस्ट रोजी हा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यावर आतापर्यंत 4 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला. हा व्हिडीओ पाहून बरेच लोक आश्चर्यचकित झाले. एका वापरकर्त्याने लिहिले, “हा व्हिडीओ पाहून मला धक्का बसला.” दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले, “शूर, धैर्यवान आणि समर्पित संघास सलाम.”