Video: चिमुकल्या सीताचा गोंडस डान्स होतोय व्हायरल

या चिमुकल्या सीताच्या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फारच व्हायरल होत आहे. तसंच या व्हिडिओ खूप चांगल्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

Mumbai
Little Sita dances in super cute viral video. She made me happy, says Internet
Video: चिमुकल्या सीताचा गोंडस डान्स होतोय व्हायरल

ट्विटर हे नेहमी वाद करण्याचे माध्यम नाही. या माध्यमावर एका बाजूला बघायला गेले तर खूप गोड आणि भन्नाड व्हिडिओ देखील असतात. असाचं एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. २० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये रामायणातील राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या वेशभूषेत तीन चिमुकले आहेत. या व्हिडिओमधील चिमुकले राम आणि लक्ष्मण शांत उभे असून चिमुकली सीता ही आनंदी होऊन बँजोच्या तालावर थिरकताना दिसत आहे. सुभाष नावाच्या ट्विटर युझरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. आणि असं टि्वट केलं आहे की, ‘का सीता मां इतकी खुश झाली आहे?’

पण या व्हिडिओ मधील गोंडस अशी सीता खूप सुंदर डान्स करत आहे. पहा या गोंडस सीताचा व्हिडिओ……

हेही वाचा ट्विटरवर जास्त फॉलोअर्स असणारे ‘हे’ आहेत ५ बॉलिवूड स्टार

नेटकरी या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. २ लाखपेक्षा अधिक हा व्हिडिओ पाहिला गेला असून १५ हजार पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. तसंच ४ हजार पेक्षा जास्त रिट्विट केलं आहे.

‘त्या चिमुकलीने मला आनंदी केलं आहे. किती गोंड मुलं आहेत. तिने स्वाभाविकपणे त्या तालावर थिरकली आहे’, अशी एका युझर प्रतिक्रिया दिली आहे. पहा युझरने काय दिल्या प्रतिक्रिया…..

हेही वाचाVideo: यूपीच्या व्यक्तीने आपल्या बाईकला बनवले ‘Tarzan’