घरट्रेंडिंगमेक्सिकोला शोध 'त्या' ८ भारतीय चित्रकारांचा

मेक्सिकोला शोध ‘त्या’ ८ भारतीय चित्रकारांचा

Subscribe

मेक्सिकोच्या त्या स्पर्धेतील १८०० चित्रांचे पुन्हा अ वर्ल्ड ऑफ फ्रेंडशीप यांतर्गत प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यासाठीच ५० वर्षानंतर ही लहान मुले आता काय करत आहेत ही जाणून घेण्याची उत्सुकता मेक्सिको प्रशासनाला आहे.

५० वर्षांपूर्वी पहिला ऑलिम्पिक सामने मेक्सिकोमध्ये खेळवण्यात आले. या स्पर्धांवेळी जागतिक पातळीवरील लहान मुलांसाठी एक चित्रकला स्पर्धा देखील घेण्यात आली. यात भारतातील ८ लहान मुलांनी काढलेले चित्र निवडण्यात आले. ‘मुंदो दे अमिस्ताद’ म्हणजे मैत्रीपूर्ण जग या थीमवर आधारित चित्र मेक्सिकोच्या शहरात देखील लावण्यात आली होती. पण आता तब्बल ५० वर्षांनंतर या चित्रकारांचा शोध मेक्सिको घेत आहे.

JITENDRA_PARIKH
जितेंद्र पारेखने रेखाटलेल्या बाजाराचे चित्र (सौजन्य- THE WIRE)

त्या भारतीय मुलांचा शोध

मेक्सिकोत झालेल्या या लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धेत भारतासह ८० देशातील मुलांनी सहभाग घेतला होता. भारतीय विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांमध्ये भारतातील वेगवेगळ्या संस्कृतीचे प्रदर्शन घडवण्यात आले होते. यात प्रामुख्याने नर्तिका, गारुडी, भारतातील गजबजलेले बाजार, हत्तीवरील सफारी अशी काही चित्रे काढण्यात आली होती. या लहानग्यांनी रेखाटलेली चित्रे अजूनही मेक्सिकोने जपून ठेवली आहेत. त्यातील एका सहभागी चित्रकाराचे नाव लीला सुधाकरन असे आहे. या शिवाय सुजाता शर्मा (१४) ,ईरा सचदेव (१२) ,सनातन कुंडू (१३), विवेक कुचीभट्टला, एला ईएमएस काही चित्रांमागे ही नावे आहेत. मेक्सिकोच्या दिल्लीतील दूतावासाने ही चित्रे एका पत्रकावर या बाल चित्रकारांच्या नावासह छापली आहेत. आणि आता त्यांचा शोध सुरु झाला आहे.

- Advertisement -

Ira-Sachdeva-
इरा सचदेवने रेखाटलेले चित्र (सौजन्य- THE WIRE)
MEXICO Painting
नर्तिकांची पोझ (सौजन्य- THE WIRE)
Sanat-Kundu
संकेत कुंदू याने रेखाटलेले चित्र (सौजन्य- THE WIRE)

पुन्हा होणार प्रदर्शन

मेक्सिकोच्या त्या स्पर्धेतील १८०० चित्रांचे पुन्हा अ वर्ल्ड ऑफ फ्रेंडशीप यांतर्गत प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यासाठीच ५० वर्षानंतर ही लहान मुले आता काय करत आहेत ही जाणून घेण्याची उत्सुकता देखील मेक्सिको प्रशासनाला आहे. दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार एकूण १० भारतीय मुलांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यातील ८ जणांची नावे आणि वय या चित्रांच्या मागे आहे. तर ३ लहान मुले या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांसोबत आलेली होती. त्यामुळे आता शोध सुरु झाला असून शंकर आंतरराष्ट्रीय बाल चित्रकला स्पर्धतील काही निवडक मुलांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याची माहिती देखील समोर आली आहे. या माहितीच्या आधारावर देखील या मुलांचा शोध सुरु झाला आहे.

Mural-Vivek-Kuchibhatla
मुरल विवेक कुटीभाटलाने रेखाटलेले चित्र(सौजन्य- THE WIRE)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -