घरट्रेंडिंगमाकडाने चक्क मोबाईल उचलून केले सामान ऑर्डर; व्हिडिओ व्हायरल

माकडाने चक्क मोबाईल उचलून केले सामान ऑर्डर; व्हिडिओ व्हायरल

Subscribe

हा सर्व प्रकार CCTV फुटेजमध्ये कैद

माकडाचे कारनामे आपण जाणतोच. माकड कोणालाही हैरान करेल असा जंगली प्राणी आहे. मात्र चीनमध्ये एका पाळीव माकडाने शक्कल लढवत चक्क किराणा मालाचे सामान ऑर्डर केले आहे. हा सर्व प्रकार CCTV फुटेजमध्ये कैद झाला आहे. या चालाख माकडाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून सगळीकडे त्याचीच चर्चा रंगताना दिसतेय. चीनमधील चांग्जोउच्या यानचेंग वाइल्ड एनिमल वर्ल्डमध्ये काम करणाऱ्या महिलेच्या फोनवर तिच्या अकाऊंटवरून एक ऑर्डर झाल्य़ाचा मॅसेज पाहिल्यावर ती थक्क झाली. मात्र तिने CCTV फुटेज पाहिल्यावर तिच्या लक्षात आले की, हा सगळा प्रकार तिच्या घरात पाळलेल्या माकडाने मोबाईल हातात घेऊन काही सामान ऑर्डर केले होते.

- Advertisement -

ही महिला काही गोष्टी ऑर्डर करणार होती. मात्र माकडाला उपाशी बघितल्यावर ती किचनमध्ये जेवण बनवायला जाते. परत आल्यानंतर तिने आपला फोन बघितला त्यानंतर तिला लक्षात की फोनवरून ऑनलाईन ऑर्डर करण्यात आली होती आणि ही ऑर्डर माकडाने प्लेस केली होती. हा प्रकार बघून ती थक्क झाली.

या महिलेने माध्यमांशी बोलताना ही ऑर्डर त्या महिलेने रद्द केली नसल्याचे सांगितले. कारण माकडाने जरी अनोखे कारनामे करून सामान ऑर्डर केले असले तरी ते घरासाठी आवश्यक होते.


कुत्र्याच्या कपाळाला शेपटी कधी पाहिलीये का? मग पाहाच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -