घरट्रेंडिंगभारतात पुन्हा नोटबंदी? दोन हजाराची नोट बंद होणार?

भारतात पुन्हा नोटबंदी? दोन हजाराची नोट बंद होणार?

Subscribe

दोन हजाराच्या नोटा चलनातून बाद होणार, असा मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे ऐन उत्सावाच्या काळात दोन हजाराची नोट बंद पडली, तर रोख रकमेची मोठी टंचाई उद्भवेल, अशी भीती अनेकांना वाटत आहे.

गेल्या काही दिवसांपासून दोन हजारच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याची चर्चा सुरु आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर देखील अनेक मॅसेज फिरत आहेत. त्यामुळे ऐन उत्सावाच्या काळात दोन हजाराची नोट बंद पडली, तर रोख रकमेची मोठी टंचाई उद्भवेल, अशी भीती अनेकांना वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली अचानक ५०० आणि १००० नोटांच्या बंदीची घोषणा केली. अचानक पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यामुळे मोठा गोंधळ झाला होता. ऐन सणासुधीला अशाच गोंधळाची पुनरावृत्ती झाली तर मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागेल, असे अनेकांना वाटत आहे.

एटीएममध्ये दोन हजारांच्या नोटा बंद?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटांचे स्लॉट्स हटवले जात असल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशानुसार एसबीआयने लहान शहरांमधील एटीएममधून दोन हजार रुपयांच्या नोटांचे स्लॉट हटवून त्याऐवजी १००, २०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे स्लॉट्स वाढवले जात असल्याचे वृत्त व्हायरल होत आहे. मात्र, यात काहीच तथ्य नसल्याचे आरबीआयच्या मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले आहे. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisement -

आरबीआयच्या अधिकाऱ्याचे स्पष्टीकरण

आरबीआयच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दोन हजारच्या नोटा बंद होण्याची बातमी चुकीची आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे त्या अधिकाऱ्याने आवाहन केले. आरबीआयने दोन हजारच्या नोटांचे स्लॉट बंद करण्याचा आदेश दिला असता तर त्याबद्दलची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असती. त्यामुळे लोकांनी चिंता न करण्याच आवाहन आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -