घरट्रेंडिंगमदरशांमध्ये कुर्ता-पायजमा ऐवजी 'शर्ट-पँट'?

मदरशांमध्ये कुर्ता-पायजमा ऐवजी ‘शर्ट-पँट’?

Subscribe

उत्तर प्रदेशातल्या मदरशांमध्ये आता कुर्ता-पायजमा ऐवजी 'शर्ट-पँट' घालण्याचा नवा प्रस्ताव, योगी सरकारकडून मांडण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशातल्या मदरशांना आधुनिकतेकडे नेण्याच्या उद्देशाने योगी सरकारने एक आगळावेगळा प्रत्साव मांडला आहे. या प्रस्तावामध्ये राज्यातील मदरशांमध्ये आता कुर्ता-पायजमा ऐवजी शर्ट-पँट हा पेहराव निश्चीत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कुर्ता-पायजमा ऐवजी शर्ट-पँट घालणं अनिवार्य करावं अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबतचा कोणताही ठोस नियम अद्याप लागू करण्यात आला नसून, याविषयीची घोषणा मात्र करण्यात आली आहे. मुस्लिम वक्फ आणि हज राज्यमंत्री मोहसिन रजा यांनी याबाबतची घोषणा केली आहे. यामुळे सध्या विविध प्रकारच्या चर्चांना चांगलच उधाण आलं आहे.

विद्यार्थ्यांची ओळख बदलण्यासाठी…

मोहसिन रजा यांच्या म्हणण्यानुसार, ‘मदरशांमध्ये शिकणारे विद्यार्थी सर्वसाधारणत: कुर्ती आणि पायजमा वापरतात. या पेहरावामुळे विद्यार्थी एका विशिष्ट धर्माचे असल्याचं ठळकपणे दिसून येतं. मात्र, बदलत्या काळानुसार मदरशातील विद्यार्थ्यांची ही ओळख बदलणं गरजेचं आहे. त्यामुळे अन्य शाळांप्रमाणे या मुलांनीही पँट-शर्ट घालावी अशी माझी मागणी आहे.’ दरम्यान या नव्या पेहरावाबाबत सध्या विचारविनीमय चालू असून, युपी सरकार लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचंही रजा यांनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

अभ्यासक्रमात केला होता बदल…

मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने, याआधीही योगी सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार मदरशातील मुलांचा अभ्यासक्रम बदलण्यात आला होता. त्यातही प्रामुख्याने गणित, हिंदी आणि इंग्लिश या तीन विषयांच्या अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला होता. याचप्रमाणे आता शर्ट-पँटच्या या नव्या ड्रेसकोड विषयीही युपी सरकार गंभीरतेने विचार करत असल्याचं दिसत आहे. आता यासंदर्भातला ठोस निर्णय कधी लागू केला जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -