घरमहाराष्ट्रनाशिकगावोगावची टपाल कार्यालयेही डिजिटल

गावोगावची टपाल कार्यालयेही डिजिटल

Subscribe

आयटी आधुनिकीकरण प्रोजेक्ट 2012 अंतर्गत ग्रामीण भागातील 1 लाख 30 हजार पोस्ट कार्यालयांचे सक्षमीकरण

दिडशे वर्षापासून भारतीय डाक विभाग हा दळणवळण व्यवस्थेतील प्रमुख आधार बनलेला आहे. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात याची महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. मोबाईल व इंटरनेटचा वाढता प्रभाव तसेच कुरियर कंपनी यांच्या स्पर्धेचा सामना पोस्टाला करावा लागत आहे. यामुळेच पोस्टाने कात टाकत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आयटी आधुनिकीकरण प्रोजेक्ट 2012 अंतर्गत ग्रामीण भागातील 1 लाख 30 हजार पोस्ट कार्यालयांना सक्षम व आधुनिक करण्यासाठी डिजिटल ऍडव्हान्समेन्ट ऑफ रुरल पोस्ट ऑफिसेस फॉर अ न्यू इंडिया अर्थात दर्पण प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

दर्पण अंतर्गत ग्रामीण भागातील पोस्ट ऑफिसला नव संजीवनी मिळणार आहे. मागील 6 महिन्यांपूर्वीच या प्रकल्पाची यशस्वी सुरुवात झालेली आहे. नाशिक विभागातील 267 शाखा डाकघर यामुळे डिजिटल झालेली आहेत. खेडेगावात बचतीचे व्यवहार, विमा हप्ता, मनी ऑर्डर तसेच टपाल वितरणाचे काम होते. यापूर्वी ही सर्व माहिती तालुक्याच्या ऑफिसला अपडेट केली जात असे. दर्पण प्रकल्पामुळे ही सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहे. त्यासाठी पोस्टमास्तरला ‘आरआयसीटी’ व सौर ऊर्जेवर चालणारे उपकरण दिले आहे.

- Advertisement -

मागील सहा महिन्यापासून ‘आरआयसीटी’ मशीनवर सर्व बचतीचे, विम्याचे, टपाल वितरणाचे काम पूर्णपणे ऑनलाइन होत आहेत. रजिस्टर, स्पीड पोस्ट बूक झाल्यापासून ते वितरण करेपर्यंतचा सर्व प्रवास हा ऑनलाइन ट्रॅक होत आहे. त्यामुळेेे ग्राहक समाधानी आहेत. यापूर्वी स्पीड पोस्ट ही सुविधा फक्त मुख्य पोस्टातच उपलब्ध होती; परंतु आता ही सुविधा गावोगावी उपलब्ध आहे. मनरेगा तसेच सामाजिक सुरक्षा यांचे पैसे थेट खातेधारकाच्या खात्यात जमा होत आहे. ती रक्कम खातेदारांना देणेही ‘आरआयसीटी’ मशीनच्या साहाय्याने सुलभ झालेले आहे. खर्‍या अर्थाने खेडेगावातील पोस्ट ऑफिसेस डिजिटल होत आहेत. यामुळे पोस्टाच्या गुणवत्तेत, कार्यक्षमतेत वाढ होणार असून ग्राहक वर्गाला मोठा फायदा होणार आहे. वेळेत, चांगल्या सुविधा मिळाल्यामुळे पोस्टाच्या ग्राहक वर्गात भर पडत आहे.

सुविधांचा लाभ घ्यावा

दर्पण प्रोजेक्टमुळेे शाखा डाक घरातील सर्व व्यवहार ऑनलाइन झाले आहेत. यामुळे पोस्टाच्या तसेच सरकारच्या सर्व योजना तळागाळात पोहोचण्यास मदत होणार आहे. पोस्टाच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. सर्व जनतेने पोस्टाच्या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. – आर. डी. तायडे, प्रवर डाक अधीक्षक, नाशिक विभाग

- Advertisement -

गतिमानतेमुळे आनंद

मागील सहा महिन्यांपासून आरआयसीटी मशीनवर पूर्णपणे ऑनलाइन व्यवहार करत आहे. लोकांची कामे तत्काळ झाल्यामुळे त्यांना आनंद होत आहे. – श्रावण भागवत, शाखा डाकपाल, ठाणगाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -