घरदेश-विदेशउन्नाव बलात्कार प्रकरण; भाजप आमदाराविरोधात आरोपपत्र दाखल

उन्नाव बलात्कार प्रकरण; भाजप आमदाराविरोधात आरोपपत्र दाखल

Subscribe

उन्नाव बलात्कार प्रकरणामध्ये भाजप आमदारासह पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. बलात्काराच्या आरोपाखाली कुलदीप सिंह सध्या जेलमध्ये आहेत.

उन्नाव बलात्कार प्रकरणामध्ये सीबीआयने भाजप आमदार कुलदीप सिंहसह पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. बलात्काराच्या आरोपाखाली भाजप आमदार कुलदीप सिंह सध्या जेलमध्ये आहेत. चौकशीअंती कुलदीप सिंह, जयदीप सिंह, विनीत मिश्रा, वीरेंद्र सिंह, रामशरण सिंह आणि शशि प्रताप सिंह विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सर्व आरोपी हे उन्नाव जिल्ह्यातील माखी गावचे रहिवासी आहेत. आमदार कुलदीप सिंह यांनी नोकरी देण्याच्या निमित्ताने बलात्कार केल्याचा आरोप पीडिताने केला आहे. त्याच आरोपाखाली आमदार कुलदीप सिंह सध्या जेलमध्ये आहेत.

काय आहे प्रकरण?

कुलदिप सिंह बांगरमऊ मतदारसंघामधून भाजपचे आमदार आहेत. वर्षभरापूर्वी आमदारांनी साथीदारांसह बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. त्यानंतर पीडितेने मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला होता. याचदरम्यान शस्त्रास्त्र कायद्याखाली अटकेत असलेल्या पीडितीच्या वडिलांचा पोलीस कोठडीतच संशयितरित्या मृत्यू झाला होता. या संपूर्ण प्रकरणामुळे योगी सरकारवर कारवाईसाठी दबाव वाढला होता. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही नोटीस बजावल्यानेही आदित्यनाथ सरकारसमोरच्या अडचणी वाढल्या होत्या. यानंतर संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी, अशी शिफारस देखील योगी सरकारने केंद्राकडे केली होती. प्रकरण संवेदनशील असल्याने पंतप्रधान कार्यालयाने देखील त्याची गंभीर दखल घेत प्रकरण सीबीआय चौकशीला मंजुरी दिली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. याप्रकरणी आता सीबीआयने भाजप आमदार कुलदीप सिंह यांच्यासह पाच जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -