घरमनोरंजनअमिताभ बच्चन यांनी दिले निवृत्तीचे संकेत

अमिताभ बच्चन यांनी दिले निवृत्तीचे संकेत

Subscribe

कोलकाता येथे होणाऱ्या फिल्म फिस्टिव्हलला प्रकृतीच्या कारणामुळे सहभागी होता येणार नाही याबाबत अमिताभ बच्चन यांनी नाराजी व्यक्त केलीआहे.

‘बस एवढं समजून घ्या, एक समजूतदार हृदयही थकतं, जर त्याने समजवलेल्या गोष्टी समजतच नसतील तर’, असे अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यातून अमिताभ बच्चन चित्रपट सृष्टीतून निवृत्ती घेत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अमिताभ बच्चन ७७ वर्षांचे आहेत. ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान बच्चन यांना दुखापत झाली होती तेव्हापासून त्यांना लिव्हरचा त्रास होत आहे. दरम्यान, बच्चन यांनी ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी कोलकाता येथे होणाऱ्या फिल्म फिस्टिव्हलला प्रकृतीच्या कारणामुळे सहभागी होता येणार नाही याबाबत खेद व्यक्त केला आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सध्या त्यांची प्रकृती ठिक नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन आता विश्राम करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन ते चार दिवसांच्या उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. प्रकृतीच्या तक्रारीमुळे यावेळी विधानसभा निवडणुकीला त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता. शनिवारी बच्चन यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते बेडवर बसले आहेत आणि टीव्हीवर फूटबॉलची मॅच पाहत असल्याचे दिसत आहेत. बेडवर त्यांचे फक्त पाय दिसत आहेत.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -