घरफिचर्सधबधब्यांनी सजले भीमाशंकर

धबधब्यांनी सजले भीमाशंकर

Subscribe

पावसाच्या आल्हाददायक वातावरणामुळे या परीसरात दाट धुकं पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात अंगाची लाही लाही झालेला पर्यटक त्यामुळेच या ठिकाणी येताना दिसत आहे

पावसाळ्यात निसर्गाचे नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. सध्या पुण्यातील भीमाशंकर परीसरातही असाच काहीसा अनुभव येत आहे. पावसामुळे हिरवेगार झालेले डोंगर शिवाय ठिकठिकाणी डोंगरातून वाहणारे धबधबे पाहायला मिळत आहेत. भोरगिरी डोंगरातील असाच एक पांढराशुभ्र धबधबा सध्या पर्यटकांना आकर्षित करत आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

bhimashankar_waterfall
भीमाशंकर येथील धबधबा ( रोहिदास गाडगे- प्रतिनिधी)

दाट धुके आणि पावसाच्या सरी

पावसाच्या आल्हाददायक वातावरणामुळे या परीसरात दाट धुकं पाहायला मिळत आहे. ऐन उन्हाळ्यात अंगाची लाही लाही झालेला पर्यटक त्यामुळेच या ठिकाणी येताना दिसत आहे. विशेषत: शनिवार -रविवार या वीकेंडच्या दिवशी तर येथे पर्यटकांची विशेष गर्दी दिसून आली. पर्यटकांचा उत्साह पाहता येथे रस्त्यालगत असलेली चहाची टपरी आणि भजींची दुकानेही पर्यटकांनी फुलून गेली आहेत.

- Advertisement -
bhimashankar
भीमाशंकरचा हिरवागार डोंगर (रोहिदास गाडगे, प्रतिनिधी)

धबधब्यांचीही नावे

भोरगिरी येथे असलेल्या धबधब्यांची नावे देखील तितकीच खास आहेत. भोरगिरीच्या , भिवेगाव आव्हाट या परिसरातील डोंगरातून एन्जॉय धबधबा, हरामीचा धबधबा, भोरगड धबधबा, नेकलेस धबधबा, मोरोशी धबधबा, पाभे धबधबा, धुवोली धबधबा, खरपूड धबधवा, येळवळी धबधबा, मंदोशी धबधबा, कारकुडी धबधब हे धबधबे वाहू लागले आहेत. हे धबधबे पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहेत.

bhimashankar
भीमाशंकर (रोहिदास गाडगे, प्रतनिधी)

कसे जाल?

भीमाशंकरला मुंबईहून बायरोड ५ तास लागतात. मुंबई- पुणे- बंगळुरु  महामार्गावरुन तुम्ही जाऊ शकता. तर पुण्याहून  भीमाशंकर पोहोचण्यासाठी ३ तास लागतात. या शिवाय मुंबई आणि पुण्याहून बसदेखील आहेत.

- Advertisement -

आणखी काय पाहाल?

तुमचा भीमाशंकरला जायचा प्लॅन असेल तर या ठिकाणी कोटेश्वर मंदिर आहे. दमलेल्या भाविकांना कोटेश्वर मंदिराच्या सभामंडप हा आधार आहे. याबरोबरच धबधब्याकडे जाण्यासाठी परिसराची माहिती सांगण्यासाठी काही तरुण गाईडचे काम करीत असल्याने पर्यटकांना त्यांचा उपयोग होतो. शिवाय या ठिकाणी तुम्हाला राहायचे असेल तर भोरगिरी येथे अल्प दरात हॉटेल्सदेखील आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -