घरमुंबई'डिझबोर्ड' अॅप ठेवणार टीबी रुग्णांवर नजर

‘डिझबोर्ड’ अॅप ठेवणार टीबी रुग्णांवर नजर

Subscribe

डिझबोर्ड अॅपमुळे डॉक्टरांना त्यांच्या नजीकच्या क्षयरोग नियंत्रण अधिकाऱ्याला मेलवरुन रुग्णाविषयी माहिती देता येऊ शकेल आणि या रुग्णांची यादी तयार करता येऊ शकेल.

२०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त भारत हे राज्यसरकारचे स्वप्न आहे. असे असले तरी आजही टीबीच्या रुग्णांची संख्या ही जास्तच आहे. अनेकदा टीबी रुग्ण डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे जनजागृती केली जात असली तरी या टीबी रुग्णांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर टीबी रुग्णांवर नजर ठेवण्यासाठी एक नव अॅप लाँच केले आहे. ‘डिझबोर्ड’ असे या अॅपचे नाव या अॅपमधून टीबी रुग्णांची माहिती मिळणे सोपे होणार आहे.

असं आहे ‘डिझबोर्ड’ अॅप

डिझबोर्ड अॅपमुळे डॉक्टरांना त्यांच्या नजीकच्या क्षयरोग नियंत्रण अधिकाऱ्याला मेलवरुन रुग्णाविषयी माहिती देता येऊ शकेल आणि या रुग्णांची यादी तयार करता येऊ शकेल. डॉक्टरांना त्यांच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून या अॅपसाठी वेळ द्यावा लागणार आहे. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यात डॉक्टरांना साईन इन करायचे आहे. त्यानंतर तिथे असलेल्या पर्यायांमध्ये टीबी रुग्णांची माहिती डॉक्टरांना भरावी लागणार आहे. जेणेकरुन टीबी रुग्णांना ट्रॅक करणे सोपे होणार आहे. आयफोन आणि अँड्राईड फोनच्या अॅप स्टोअरमधून हे अॅप घेता येणार आहे.

राज्य सरकारच्या सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाच्या रुग्णांविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे. सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आदेशानुसार डॉक्टरांनी क्षयरोगाच्या रूग्णांबद्दल सरकारला सूचित करणे बंधनकारक आहे. शिवाय, असे न केल्यास भारतीय दंड संहिते (आयपीसी ) च्या Section 269 अंतर्गत डॉक्टरांना अटक आणि शिक्षा ही होऊ शकते. रुग्णांना ट्रॅक करण्यासाठी सरकारला जो तक्ता हवा आहे, त्या तत्क्यावर काम करण्यासाठी हे अॅप मदत करणार आहे. 
डॉ. विशाखादत्त पाटील, संस्थापक, असीम सिस्टीम इंडिया कंपनी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -