घरमुंबईकॉलेजांची माहिती आता एका क्लिकवर

कॉलेजांची माहिती आता एका क्लिकवर

Subscribe

महाविद्यालयांचे शैक्षणिक परीक्षण अनिवार्य, माहिती न भरल्यास कारवाई

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित सर्व कॉलेज आणि मान्यताप्राप्त संस्थांची माहिती आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. राज्य शासनाच्या पुढाकाराने मुंबई विद्यापीठाने सुरू केलेल्या कॉलेजांचे शैक्षणिक परिक्षणाचे काम अंतिम टप्प्यात पोहचले असून शैक्षणिक परीक्षण झालेल्या सर्व कॉलेजांची माहिती आता सर्व भागधारकांना सार्वजनिकरित्या उपलब्ध होईल. या महत्वाकांक्षी उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक यांना महाविद्यालयातील अभ्यासक्रम, शैक्षणिक शुल्क, पायाभूत सुविधा यांसह अनेक शैक्षणिक उपक्रमांची माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील उच्च शिक्षणाचे अध्ययन-अध्यापन, कार्यक्षम व संवेदनशील प्रशासन, शास्त्रशुद्ध व तंत्रज्ञानात्मक करण्याची तरतूद आहे. तसेच व्यवस्थापनाची व्यवहार्यता आणि वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे कॉलेजांच्या, विद्याशाखांच्या आणि विषयाच्या शैक्षणिक कामगिरीची मानके लक्षात घेता महाविद्यालयांच्या सलंग्निकरणाच्या आणि परिसंस्थांच्या मान्यतेच्या शर्ती निर्धारीत करणे आणि त्या शर्तींची पूर्तता करण्यात आली आहे. याबाबत नियतकालिक किंवा अन्य प्रकारे मुल्यांकन करुन स्वतःची खात्री पटविणे अशीही जबाबदारी विद्यापीठांवर असल्यामुळे मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित सर्व ८२३ कॉलेज आणि परिसंस्था यांचे शैक्षणिक परिक्षण करण्यासाठी शासनस्तरावर समितीचे आणि कार्यबलाचे गठण करण्यात आले होते.

- Advertisement -

यानुसार मुंबई विद्यापीठाने सर्व सलंग्नित कॉलेजांचे शैक्षणिक परीक्षण करण्यासाठी संकेतस्थळावर अ‍ॅकॅडेमिक ऑडिट पोर्टलच्या रुपाने ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली होती. यामध्ये सर्व कॉलेजांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड देऊन त्यांच्या कॉलेजासंबंधी सर्व माहिती १५ जानेवारीपर्यंत भरणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. यानुसार काही कॉलेजांनी माहिती भरली आहे, मात्र ज्या कॉलेजांनी माहिती भरली नाही अशा कॉलेजांवर कारवाई करण्याचे विद्यापीठ प्रशासनाने ठरविले आहे. कॉलेजांचे शैक्षणिक परीक्षण हे अनिवार्य असल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -