घरताज्या घडामोडीवालधुनी नदीत निर्दयी मातेने फेकले ३ महिन्याचे अर्भक

वालधुनी नदीत निर्दयी मातेने फेकले ३ महिन्याचे अर्भक

Subscribe

वालधुनी नदीत निर्दयी मातेने फेकले एक ३ ते ४ महिन्याचा अर्भक सापडले आहे.

एका निर्दयी मातेने ३ ते ४ महिन्याचे अर्भक एका प्लास्टिकच्या पिशवीत भरून नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृत अर्भकाला मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे.

नेमके काय घडले?

उल्हासनगर कॅम्प ५ येथील कैलाश कॉलनी जवळ ही घटना घडली आहे. कैलाश कॉलनी जवळच्या वालधूनी नदीत एका मातेने आपले ३ ते ४ महिन्याचे अर्भक एका प्लास्टिकच्या पिशवीत घालुन नदीत फेकून दिले होते, ही बाब स्थानिक नागरिकांना समजली असता त्यांनी याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन ते मृत अर्भकाला मध्यवर्ती रुगणालयात शवविच्छेदन पाठवले असून अधिक तपास पोलिस करीत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – डोंबिवलीत भाजपच्या क्रिकेट सामन्यात मराठी भाषिकांना ‘नो एन्ट्री’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -