घरताज्या घडामोडीLockDown: लवकरच 'या' राज्यात दारू विक्रीला सुरुवात होणार!

LockDown: लवकरच ‘या’ राज्यात दारू विक्रीला सुरुवात होणार!

Subscribe

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशातला लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने ११ प्रकारच्या उद्योगांना काम सुरू करण्याची परवानगी दिली आहे. उत्तर प्रदेशाच्या योगी सरकाने दारू विक्री सुरू करण्यावर विचार करत असल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशच्या सरकारचे प्रमुख सचिव संजय आर, भूसरेड्डी यांनी सर्व मंडळ आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रानुसार, सरकार  दारू विक्री करण्यासाठी तयारी करत आहे. यामुळे सरकारच्या आबकारी विभाग दारू/ बियरच्या फॅक्ट्रीजमध्ये उत्पादन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत, असं समोर आलं आहे.

उत्तर प्रदेशाच्या सरकारकडून जाहीर केलेल्या आदेशातून सांगितलं गेलं की, केंद्र सरकारच्या नियमात पालन करत उत्पादकांच्या कामाला सुरुवात केली जाईल. हे आदेश उत्पादकांसाठी असून विक्री करण्यासाठी नाही आहे. विक्री करण्यासाठी अद्याप कोणतेही आदेश दिले गेले नाहीत. विक्रीसाठी योग्य पूर्व उत्पादनाची तयार करणे आवश्यक आहे.

- Advertisement -

याशिवाय गुरुवारी उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या उद्योगांना दिलासादायक आदेश देण्यात आला. उत्तर प्रदेश सरकारने आवश्यक सेवांसह ११ प्रकारच्या उद्याेगांना काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. माहितीनुसार, उत्तर प्रदेश सरकारने स्टील, तेल, सिमेंट आणि उर्वरित उद्योगांना काम सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे.


हेही वाचा –  CoronaVirus: अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार; मृतांचा आकडा ३० हजार पार!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -