घरCORONA UPDATECoronavirus: वरळीकरांमुळे वेसावकर शहाणे; मासे विक्री बंद, जनता कर्फ्यु सुरु

Coronavirus: वरळीकरांमुळे वेसावकर शहाणे; मासे विक्री बंद, जनता कर्फ्यु सुरु

Subscribe

वरळी कोळीवाड्यात कोरोनाची बाधा होवून संपूर्ण कोळीवाड्यालाच क्वारंटाईन करावे लागले होते. त्यामुळे वरळी कोळीवाड्यात निर्माण झालेल्या परिस्थितीतून धडा घेत वर्सोव्यातील कोळीबांधव शहाणे झाले आहे.

वरळी कोळीवाड्यात कोरोनाची लागण होवून एकाच वेळी दोनशेहून अधिक लोकांना क्वारंटाईन करण्याची वेळ आली होती. वरळी कोळीवाड्यात कोरोनाची बाधा होवून संपूर्ण कोळीवाड्यालाच क्वारंटाईन करावे लागले होते. त्यामुळे वरळी कोळीवाड्यात निर्माण झालेल्या परिस्थितीतून धडा घेत वर्सोव्यातील कोळीबांधव शहाणे झाले आहे. सुरुवातीला येथील घाऊक मासेविक्रीचा व्यवसाय बंद केल्यानंतर आता येथील लोकांनी तीन दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करत एकप्रकारे कोळीवाड्यातील कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत ही साखळी तोडण्याचा प्रयत्न केला आहे.

अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा-यारी येथील कोळीवाडा हा लोकसंख्येच्या तुलनेत वरळी कोळीवाड्याच्या दीडपट आहे. परंतु वरळी कोळीवाड्यात ज्याप्रकारे कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढली आणि तेथील परिस्थिती नियंत्रणात आणेपर्यंत महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा नाकी जीव आला. परंतु वरळीत जे घडले तेच जर वर्सोवा कोळीवाड्यात घडले तर याच भीतीने के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे तसेच प्रत्येक गल्लीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना विश्वासात प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यास सुरुवात केली. त्यामुळे पहाटे चार वाजल्यापासून होणारी घाऊक मासे विक्रीचा बाजार पोलिसांच्या सहकार्याने बंद केला. त्यामुळेच या कोळीवाड्यात काही प्रमाणात मर्यादित यश मिळवण्यात महापालिकेला यश आल्याचे के-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

कोळीवाड्यात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात पसरण्याची भीती लक्षात घेवून प्रत्येक गल्लीचे अध्यक्ष व पदाधिकारी यांना विश्वासात घेवून याठिकाणी तीन दिवस जनता कर्फ्यु लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारपासून जनता कर्फ्यु लागू झाला आहे. त्यामुळे सध्या या कोळीवाड्यात केवळ १२ रुग्ण आढळून आले असून आतापर्यंत चार रुग्ण बरे होऊन घरीही परतले आहेत. नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि सहायक आयुक्तांचे प्रयत्न यामुळे येथील कोरोनाचा संसर्ग रोखण्यात आतापर्यंत तरी काही प्रमाणात आम्ही यशस्वी ठरल्याचे नगरसेविका प्रतिमा खोपडे यांनी स्पष्ट केले.

रमजानसाठी घरोघरी वस्तूंची विक्री

- Advertisement -

वर्सोवा-यारी रोड येथे मोठ्याप्रमाणात मुस्लिम लोकवस्ती आहे. त्यामुळे मुस्लिमांचा रमजान ईद सुरु असल्याने त्यांच्या सणामध्ये फळे, खजूर आदी वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी नगरसेविका व मशिदींचे मौलाना आदींसोबत चर्चा केली. सुरुवातीला मौलानांचेही काही प्रश्न होते. पण ही लढाई अस्तित्वाची असल्याची जाणीव त्यांना करून दिली. त्यानंतर त्यांनी याला तयारी दर्शवली. मुस्लिम समाजबांधव खरेदीसाठी बाहेर पडत असल्याने त्याच वस्तू त्यांना घरीच उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खुल्या मैदानांमध्ये बाजार भरु देणे हेही योग्य ठरणार नाही. त्यामुळे एखाद्या मोठ्या हॉलच्या जागेत फळ व खजूरची पाकिटे तयार करून विकण्यास विक्रेत्यांना परवानगी दिली जाणार आहे. यामध्ये नगरसेविका व मौलाना यांच्या मदतीने ही व्यवस्था करून ज्या मुस्लिम बांधवांना या वस्तू खरेदी करायच्या आहेत, त्यांना घरोघरी जावून त्याचे वितरण करण्याची व्यवस्था करून दिली जाईल. मात्र या वस्तू मोफत नसतील. बाहेर जावून ज्या वस्तू ते खरेदी करणार आहेत, आता त्यांना घर बसल्या मिळतील. यामुळे जास्तीत जास्त लोकांना रस्त्यावर येण्यापासून रोखता येईल आणि पर्यायाने या आजारावर मात करता येईल,असे मोटे यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -