घरमहाराष्ट्रराज्यातील करोना रुग्ण १० हजारांच्या पार

राज्यातील करोना रुग्ण १० हजारांच्या पार

Subscribe

गुरुवारी राज्यात ५८३ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या १०,४९८ झाली आहे. आज १८० रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १७७३ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर राज्यात गुरुवारी २७ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृत्युंची संख्या ४५९ झाली आहे.

मुंबईत गुरुवारी तब्बल 417 रुग्ण सापडल्याने करोनाबाधितांचा आकडा 6874 वर पोहचला आहे. त्याचप्रमाणे 20 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 290 वर पोहचला आहे. मुंबईतील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ गुरुवारीही कायम राहिली. करोनाची संख्या वाढत असतानाही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून सर्रास बाहेर पडत असल्याने मुंबईतील करोनाचा विस्फोट रोखणे अवघड असल्याचे दिसून येत आहे. मुंबईमध्ये 417 करोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील करोनाबाधितांचा आकडा 6874 वर पोहचला आहे.

- Advertisement -

करोनाबाधित रुग्णांमध्ये 27 आणि 28 एप्रिलदरम्यान करोना चाचणी केलेल्या 110 जणांचा अहवाल गुरुवारी आल्याने त्याचा यात समावेश केला आहे. तसेच मुंबईमध्ये 20 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 290 वर पोचली आहे. 20 मृत झालेल्या व्यक्तींपैकी 16 जण हे दीर्घकाळ आजारी होते. यामध्ये 14 पुरुष तर 6 महिलांचा समावेश आहे. मृतांमधील 8 जण हे 60 वर्षांवरील तर 12 जण हे 40 ते 60 च्या दरम्यान आहेत.

मुंबईत करोनाचे 498 संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित करोना रुग्णांची संख्या 10 हजार 30 वर पोहचली आहे. तसेच 45 रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल 1472 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -