घरCORONA UPDATELockdown - कौटुंबिक हिंसाचारात वाढ, विवाहितेची आत्महत्या!

Lockdown – कौटुंबिक हिंसाचारात वाढ, विवाहितेची आत्महत्या!

Subscribe

शीतल खैरे असे या विवाहितेचे नाव आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे. या लॉकडाऊनमुळे एकत्रित आलेल्या कुटुंबात कौटुंबीक हिंसाचार वाढत आहे. गुरुवारी दुपारी पतीपत्नीत झालेल्या कौटुंबीक वादातून पत्नीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसानी आत्महत्येची नोंद केली आहे.

शीतल खैरे असे या विवाहितेचे नाव आहे. शीतल ही पती दिलीप आणि दोन वर्षांच्या मुलासोबत कल्याण पूर्वेतील जरीमरी नग या ठिकाणी राहण्यास होती. पती दिलीप याचा रेडिमेड कपडे विक्रीचा व्यवसाय आहे, मात्र लॉकडाऊन मुळे व्यवसाय बंद असल्यामुळे दिलीप हा घरीच होता, परंतु गेल्या काही दिवसांत दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होत होता. सततच्या भांडणाला कंटाळून शितल हीने चेंबुरमध्ये राहणाऱ्या आपल्या आईवडीलांना फोन करुन मला येथून घेऊन जा, मला इथे खूप त्रास सहन करवा लागत आहे असे सांगितले होते,परंतु लॉकडाऊन मुळे आपण कल्याणला येऊ शकत नसल्याचे तिच्या आई वडीलांनी तिला सांगितले होते .काल दुपारी ३ च्या सुमारास आपला पती आणि मुलगी खालच्या खाेलीत असताना शितल हिने वरच्या रुम मध्ये जाऊन गळफास घेवून आत्महत्या केली.

- Advertisement -

या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शीतलचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आलेला असून घटनास्थळी पोलिसाना सुसाईड नोट मिळून न आल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण काय होते याबाबत काहीही कळू शकलेले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराव साळवे यांनी सांगितले.  शीतलच्या मृत्यूप्रकरणी तिच्या आईलडीलाना कळवण्यात आलेले आले असल्याची माहिती साळवे यांनी दिली.

या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आलेली असून तपास सुरू असून तपासात आत्महत्येचे कारण स्पष्ट झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे साळवे यांनी सांगितले.

- Advertisement -

हे ही वाचा – लॉकडाऊनच्या काळात राम मंदिर उभारणार – मुख्यमंत्री आदित्यनाथ


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -