घरताज्या घडामोडीकृषी निविष्ठांच्या तपासणीसाठी 16 भरारी पथके

कृषी निविष्ठांच्या तपासणीसाठी 16 भरारी पथके

Subscribe

जिल्हा परिषद कृषी सभापती संजय बनकर यांनी घेतला विभागाचा आढावा

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांना बांधावर बियाणे व रासायनिक खते पुरवली जात आहेत. शेतकर्‍यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने कृषी निविष्ठा तपासण्यासाठी जिल्हस्तरावर एक व तालुकास्तरावर 15 भरारी पथकांची स्थापना केली आहे. शेतकर्‍यांनी अधिकृत परवाना धारक कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडूनच खते, बियाने व किटकनाशके पक्क्या बिलात खरेदी करावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी केले आहे.
कृषी समितीची मासिक सभा मंगळवारी (दि.12) व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली. सभेत खते व बियाणे या कृषी निविष्ठांचा आढावा घेण्यात आला. वाढीव दराने खते व बियाण्यांची विक्री होऊ नये, म्हणून महत्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पुरवठा झालेल्या भात बियाण्यांविषयी तक्रारी प्राप्त झाल्याने याची तत्काळ तपासणी करून चौकशी करण्याचे आदेश कृषी सभापती बनकर यांनी दिले. यावेळी समिती सदस्य सहभागी झाले होते.

40 हजार क्विंटल बियानेे उपलब्ध

- Advertisement -

खरीप हंगामासाठी 21 हजार 130 मेट्रिक टन रासायनिक खतांचे आवंटन नाशिक जिल्ह्यासाठी देण्यात आले आहे. त्यापैकी 29 हजार 71 मेट्रिक टन रासायनिक खतांचा पुरवठा झाला आहे. रब्बी हंगाममधील 16 हजार 990 मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. एक आठवड्यात एकूण 54 हजार 461 मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध होणार आहे. बांधावर खते व बियाने वाटप मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 426 क्विंटल बियाने व 656 मेट्रिक टन रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आलेला आहे. खरीप हंगाम 2020 साठी विविध पिकाअंतर्गत 97 हजार 684 क्विंटल विविध पिकांच्या बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. सदरचे बियाने सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांच्याकडून उपलब्ध होणार आहे. आजपर्यंत 40 हजार 755 क्विंटल बियाणे उपलब्ध झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी दिली.

यंदा घरचेच सोयाबिन पेरा…
शेतकर्‍यांनी सोयाबीन पिकाचे बियाने प्रत्येक वर्षी बदलण्याची आवश्यकता नसल्याने ते स्वत:कडील बियान्याची उगवन क्षमता तपासून पेरणीसाठी वापरू शकतात. याकरिता कृषि विभागामार्फत प्रचार व प्रसिध्दी सुरु आहे. नाशिक जिल्ह्यासाठी बी. टी. कापूस बियानेची एक लाख 32 हजार 126 पकिटांची मागणी करण्यात आली आहे. आज अखेर 56 हजार पाकिटांचा पुरवठा झाल्याची माहिती कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी दिली.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -