घरताज्या घडामोडीअजब प्रताप; मुंबईच्या घरातून हाकत होता नांदेडच्या आरटीओचा कारभार

अजब प्रताप; मुंबईच्या घरातून हाकत होता नांदेडच्या आरटीओचा कारभार

Subscribe

नांदेड जिल्हातील आरटीओ अधिकारी संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात म्हणजे तब्बल ५४ दिवस मुंबईच्या घरातून नांदेड आरटीओचा कारभार हाकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा पडू नयेत, तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना कसली अडचण येऊन नये, याकरिता राज्यभरातील आरटीओ अधिकारी अहोरात्र काम करत आहे. मात्र, यात एका आरटीओचा वेगळाच प्रताप समोर आलेला आहे. नांदेड जिल्हातील आरटीओ अधिकारी संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात म्हणजे तब्बल ५४ दिवस मुंबईच्या घरातून नांदेड आरटीओचा कारभार हाकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या अधिकाऱ्याला परिवहन आयुक्तांकडून कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांना घरी बसविण्यात आले आहे. त्यांच्या जागी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यातील आरटीओ अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरूं आहे. या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूची पुरवठा करण्यासाठी मालवाहतूक वाहने रस्तावर धावत आहे. त्यांना ई-पास असो किंवा अन्य गोष्टीची मान्यता देण्याचं काम असो राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यलयावर आहे. तसेच राज्याच्या विविध जिल्हात अडकून पडलेल्या श्रमिक मजूरांना आपल्या राज्यात जात आहे. त्यामुळे वाहनांमध्ये मजुरांची भरगच्च वाहतूक केली जात असल्याने सोशल डिस्टनसिंगचा प्रश्न उपस्थित होत असल्याने परिवहन आयुक्तयांनी तपासणी नाक्यांवरील अधिकाऱ्यांना मालवाहू वाहनातून प्रवासी घेऊन जाणाऱ्या वाहनांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच कारवाई केल्यावर वाहनातून प्रवाशांना उतरवून एसटीच्या माध्यमाने त्याच्या राज्याच्या सीमेपर्यंत सुरक्षित सोडण्यासाठीची व्यवस्था करण्याचे आदेश आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहे. या आदेशाचे पालन होत आहे कि नाहीत, यांची चौकशी स्वतः परिवहन आयुक्त करताना दिसून येत आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्हातील आरटीओ अधिकारी २४ मोर्चापासून जेव्हा लॉकडाऊन जाहिर झाले, तेव्हापासून कर्तव्यावर न जाता ठाण्यात घरीच थांबले आहे. घरूनच नांदेड़ आरटीओचे काम करत होते. गेल्या ५४ दिवसांपासून कार्यलयात गेल्या नसल्यामुळे अनेक आरटीओ कर्मचाऱ्यांत चर्चा रंगली होती. नांदेड आरटीओच्या कार्यक्षेत्रात चार चेक पोस्ट येते. यातील सर्वाधिक महत्वपूर्ण चेक पोस्ट ती म्हणजे महाराष्ट्र – तेलंगणा सीमेवरची अनेक वाहन या चेक पोस्टवरून जातात. सध्या अनेक श्रमिक मजूर या चेक पोस्टवरून तेलंगणाकडे जात आहे. कोरोना सारख्या संवेदशील काळात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थिती नसल्यामुळे नांदेड आरटीओच्या इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा बोझा वाढला आहे.

अशी केली कारवाई

नांदेड जिल्ह्यातील आरटीओ कार्यालयात प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थिती नसल्याची तक्रार गेल्या काही दिवासांपूर्वी परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना प्राप्त झाली होती. तेव्हा शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सचा माध्यमातून नांदेड आरटीओशी संपर्क साधला. तेव्हा आयुक्तांनी विचारणा केली असताना आरटीओ अधिकाऱ्यांने घरी असल्याचे सांगितले. तेव्हा लगेच परिवहन आयुक्तांनी कारवाई करत कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. त्यांच्या जागी उपप्रादेशिक परिवहनशेखर अधिकारी यांची नियुक्ती केली आहे.

- Advertisement -

नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आरटीओ अधिकारी लॉकडाऊन काळात घरी असल्याची माहिती मिळताच, आम्ही त्यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. – शेखर चन्ने, परिवहन आयुक्त


हेही वाचा – ‘या’ ठिकाणी एसटीच्या फेऱ्या वाढणार; ९७५ बससह हजारो चालक दाखल


 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -