घरदेश-विदेशघोडेबाजाराच्या भीतीने राजस्थान कॉंग्रेसने आमदारांना हॉटेलमध्ये हलवले

घोडेबाजाराच्या भीतीने राजस्थान कॉंग्रेसने आमदारांना हॉटेलमध्ये हलवले

Subscribe

राज्यसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानात आमदारांचा घोडेबाजार सुरु

राजस्थानमध्ये कोरोना संकटात राजकारणाला उधाण आलं आहे. महाराष्ट्रासारखं राजस्थानमध्ये राजकीय नाट्याला सुरुवात झाली आहे. राज्यसभेच्या तीन जागांवर निवडणुका होण्यापूर्वी राजस्थानात आमदारांचा घोडेबाजार सुरु झाल्याचा आरोप केला जात आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या आणि अपक्ष आमदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात आहे. त्यामुळे सर्व आमदारांना जयपूरच्या शिवविलास हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.

जयपूरमधील शिवविलास हॉटेलमध्ये साध्या गणवेशातील ५० हून अधिक पोलिस कर्मचारी तैनात आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांनी सांगितलं की उच्च अधिकाऱ्यांनी आम्हाला येथे साध्या गणवेशात तैनात राहण्यास सांगितलं आहे. तसंच येणाऱ्या-जाणाऱ्यांवर आणि आमदारांवर लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे.

- Advertisement -

काय आहे संपूर्ण प्रकरण

१९ जून रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थान कॉंग्रेस पक्षाने सावधगिरी बाळगली आहे. पक्षाचे आमदार वाचवण्यासाठी पक्षाने स्वतःचे आणि अपक्ष आमदार शिवविलास हॉटेल येथे पाठवले आहेत. तत्पूर्वी, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बुधवारी सकाळी त्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. तर संध्याकाळी कॉंग्रेसचे मुख्य सचेतक महेश जोशी यांनी पोलिस महासंचालक एसीबीकडे अधिकृतपणे तक्रार केली आणि पैशाच्या बळावर अपक्ष आमदारांना लुबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. महेश जोशी यांनी डीजी, एसीबीला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, आम्हाला विश्वासू स्त्रोतांकडून कळालं आहे की मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक सारखं भाजप, कॉंग्रेसचे आणि अपक्ष आमदारांना खरेदी करुन राजस्थानमधील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे.


हेही वाचा – पवार वडिलांसारखे, त्यांना माझ्या खांद्यावरुन बंदुक चालवायची आहे – फडणवीस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -