घरक्रीडाआरोग्यसाधना.. क्रीडाकतर्फे रविवारी ऑनलाईन योगसत्र

आरोग्यसाधना.. क्रीडाकतर्फे रविवारी ऑनलाईन योगसत्र

Subscribe

क्रीडाक : बिल्डिंग स्पोर्टस कल्चर संस्थेच्या वतीने ६ व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त मोफत उपक्रम

नाशिक येथील क्रीडाक : बिल्डिंग स्पोर्टस कल्चर संस्थेच्या वतीने ६ व्या आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त मोफत ऑनलाईन योगसत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी ७ वाजता या योगसत्राचा लाभ नाशिककरांसह सर्वच नेटिझन्सना घेता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गर्दी तथा संसर्ग रोखण्यासाठी योगाचे धडे मोबाईलद्वारे ऑनलाईन दिले जात आहेत. ही एक वेगळी संधी अनुभवता येणार आहे. यातून आरोग्यसाधना हा एकमेव उद्देश असल्याने अधिकाधिक क्रीडाप्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन क्रीडाकचे संस्थापक तथा महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे फिटनेस ट्रेनर विनोद यादव यांनी केले आहे.

- Advertisement -

असे होता येईल सहभागी…

क्रीडाकच्या सोशल मीडिया लिंकवर क्लिक करून या योगसत्रात सहभागी होता येईल.
इन्स्टाग्रामसाठी…
http://@kreedak_buildingsportsculture

फेसबुकसाठी…
https://www.facebook.com/Kreedak/

Saiprasad Patil
Saiprasad Patilhttps://www.mymahanagar.com/author/sppatil/
गेल्या १३ वर्षांपासून नाशिकमध्ये पत्रकारितेचा अनुभव. सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, गुन्हेगारी यासह विविध विषयांवर लिखाण. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक स्तरावरील घडामोडींवर लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -