घरट्रेंडिंगव्हायरल Video: काकूंचा धमाल 'किकी' डान्स

व्हायरल Video: काकूंचा धमाल ‘किकी’ डान्स

Subscribe

वडोदराच्या या महिलेचा धमाला किकी डान्स पाहून, तुम्हालाही हसू आवरणार नाही.

सोशल मीडियावर सध्या किकी चॅलेंजचा ट्रेंड तुफान गाजतो आहे. सेलिब्रीटींसह जगभरातील असंख्य लोक या किकी डान्सच्या प्रेमात आहेत. अनेक सेलिब्रिटी आणि सामान्य लोकांचे 
तुम्हीही हा पाहा हा धमाल व्हिडिओ :

गुजरात पोलीसांची नाराजी

हा व्हिडिओ वडोदरा शहराच्या आसपास शूट करण्यात आला आहे. एकीकडे हे KiKiChallenge जीवघेणं ठरत असल्यामुळे ‘ते करु नका’ असं पोलीस आवाहन करत असताना, या महिलेने किकी डान्स शूट करुन तो व्हायरल केल्यामुळे वडोदरा पोलीस चांगलेच नाराज झाले आहेत. वडोदरा पोलिसांनी ट्वीटरद्वारे ही नाराजी व्यक्तही केली आहे. 

- Advertisement -

 

- Advertisement -

काय आहे #KiKiChallenge

सध्या सोशल मीडियावर #kikichallenge ही एक नवा ट्रेंड उदयास आलाय. या ट्रेंडच्या हॅशटॅगमार्फत बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होतायत. हे चॅलेंज स्वीकारुन कित्येक तरुण-तरुणी चालत्या गाडीमधून उडी मारून नृत्य करतायत. त्यांचे हे नृत्य गाडीच्या आतमधून कुणीतरी कॅमेरामध्ये रेकॉर्ड करतं. व्हिडिओतील तरुणी ज्या गाण्यावर नृत्य करते, ते गाणे ‘इन माय फिलिंग्स’ असे आहे. या गाण्याची निर्मिती कॅनडाचे नामांकित गायक आणि रॅपर ड्रेक यांनी केली आहे. ड्रेक यांनीच हे गाणे गायले आहे. हे गाणे लाँच झाल्यानंतर ऑनलाईन कॉमेडी शिग्गीने या गाण्यावर नृत्य केले. त्यानंतर हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. तिने या गाण्यावरील नृत्य सोशल मीडियावर टाकले तेव्हा #kikichallenge असा हॅशटॅगही तिने दिला होता. या हॅशटॅगनंतर जगभरातील तरुणांनी हे चॅलेंज स्विकारले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -