घरताज्या घडामोडीCorona Vaccine : कोरोना लसीवरच सर्वात मोठं ट्रायल, ३० हजार लोकांवर चाचणी

Corona Vaccine : कोरोना लसीवरच सर्वात मोठं ट्रायल, ३० हजार लोकांवर चाचणी

Subscribe

एक लस ह्यमुन ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून ही लस तब्बल ३० हजार जणांना दिली जाणार आहे.

जगभर पसरणाऱ्या कोरोना विषाणूवर लस कधी येणार याची सर्वच जण प्रतिक्षा करत आहेत. त्यातच आतापर्यंत जगभरात शंभरपेक्षा अधिक लस तयार करण्यात आल्या आहेत. त्यातच आता एक लस ह्यमुन ट्रायलच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली असून ही लस तब्बल ३० हजार जणांना दिली जाणार आहे.

दरम्यान, आता ही लस ज्या ३० हजार लोकांना दिली जाणार आहे. त्या लोकांना खरी लस दिली जात आहे की डमी याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, दोन डोस दिल्यानंतर त्याचा काय परिणाम होतो हे तपासले जाणार आहे.

- Advertisement -

कोणती आहे ही लस?

कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेल्या अमेरिकेने ही लस तयार केली आहे. mRNA 1273 ही कोरोना लस नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ अँड मॉडर्ना इंक (moderna inc) कंपनीने तयार केली आहे. मॉडर्नाच्या पहिल्या स्टेजच्या ट्रायलमध्ये ४५ लोकांना ही लस देण्यात आली आहे. त्यावेळी या लोकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली दिसून आली. मात्र, ही लस दिल्यानंतर त्या व्यक्तीला ताप आणि वेदना अशी सौम्य लक्षणे दिसून आलीत.

या आहेत कोरोनावरील लस

देशात वापरल्या जाणाऱ्या लसचे टेस्ट स्वत:च करावे या उद्देशाने अमेरिकेने लसचे ट्रायल सुरू केले आहे. प्रगत टप्प्यात असलेल्या कंपनीच्या लसचे ट्रायल ३० हजार लोकांवर होईल. या महिन्यात मॉडर्ना, पुढील महिन्यात ऑक्सफर्ड, सप्टेंबरमध्ये जॉन्सन अँड जॉन्सन आणि ऑक्टोबरमध्ये नोवावॅक्सच्या लसचा अभ्यास केला जाणार आहे. फाइजर आयएनसी स्वत:च आपल्या ३० हजार लोकांवर चाचणी करणार आहे आहेत. दरम्यान, कोरोनाची लस किती सुरक्षित आहे हे या टेस्टमध्ये पाहिले जाईल आणि त्यानंतर शास्त्रज्ञ या लशींची तुलना करतील.

- Advertisement -

हेही वाचा – Covid 19 : आतापर्यंतची सर्वात वाईट जागतिक आणीबाणी; WHO ने केली चिंता व्यक्त


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -