घरIPL 2020DC vs CSK : दिल्लीचा सलग दुसऱ्यांदा विजय; चेन्नई ४४ धावांनी पराभूत

DC vs CSK : दिल्लीचा सलग दुसऱ्यांदा विजय; चेन्नई ४४ धावांनी पराभूत

Subscribe

दिल्ली कॅपिटल्सने पृथ्वी शॉ (६४) च्या शानदार अर्धशतकाच्या खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सला ४४ धावांनी पराभूत केलं. दिल्लीचा सलग दुसरा विजय असून चेन्नई सुपरकिंग्स संघाला आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दिल्लीने विजयासाठी दिलेलं १७६ धावांचं लक्ष्य चेन्नईला पूर्ण करता आलं नाही. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून चेन्नईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवत सामन्यावर आपलं वर्चस्व राखलं होतं. दिल्लीने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ ७ गड्यांच्या मोबदल्यात १३१ धावांपर्यंत मजल मारु शकला.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १७५ धावांचं लक्ष्ये चेन्नई समोर ठेवलं. दिल्लीने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने सावध सुरुवात केली. परंतू अक्षर पटेलने वॉटसनला माघारी धाडलं आणि चेन्नईच्या डावाला गळती लागली. यानंतर मुरली विजय, ऋतुराज गायकवाड ठराविक अंतराने स्वस्तात माघारी परतले. यानंतर केदार जाधव आणि फाफ डु प्लेसिसने संघाला सावरण्याचा प्रय्तन केला. मात्र, एनरिच नॉर्टजेने केदार जाधवला २६ धावांवर पायचित करत ही भागिदारी तोडली. त्यानंतर डु प्लेसिस देखील माघारी परतला. डु प्लेसिसने ३५ चेंडूत ४३ धावा केल्या. यानंतर मैदानावर आलेल्या धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्नही तोकडे पडले. या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी संथ खेळ केला. याचाच फटका संघाला बसला. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ३, नॉर्टजेने २ तर अक्षर पटेलने १ बळी घेतला.

- Advertisement -

प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांनी दिल्लीला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पॉवरप्लेमध्ये ३६ धावा केल्या. मात्र, यानंतर दोघांनी फटकेबाजी करायला सुरुवात केली. मात्र, ११ षटकात शिखर धवन वैयक्तिक ३५ धावांवर पियूष चावलाच्या गोलंदाजीवर बाद झाला. दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉने ३५ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, ६४ या वैयक्तिक धावांवर तो पियुष चावलाच्या चेंडूवर झेलबाद झाला. श्रेयस अय्यरच्या रूपात सीएसकेला तिसरा विकेट मिळाला. अय्यरने २६ धावा केल्या. धोनीने त्याचा शानदार झेल टिपला. ऋषभ पंत ३५ आणि मार्कस स्टॉयनिस ५ धावांवर नाबाद राहिले.

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -