घरताज्या घडामोडीअन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांना अटक

Subscribe

‘रिपब्लिक टीव्ही’चे संपादक अर्णब गोस्वामी यांना पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अर्णब गोस्वामीला घेऊन पोलीस अलिबागला रवाना झाले आहेत. सकाळी २४ पोलीस अर्णब गोस्वामी यांच्या घरी पोहोचले आणि अर्णब गोस्वामी यांना ताब्यात घेतेले आहे. गोस्वामी यांचा फोन देखील पोलिसांनी जप्त केला आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी घरातून उचलले. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आता पमवेल पोलिसांनी कारवाई करत अर्णब गोस्वामी यांना अटक केली आहे.

- Advertisement -

मुंबईतील मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी ५ मे २०१८ रोजी अलिबाग येथे आत्महत्या केली. अन्वय नाईक यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’चे डिझाईन केले होते. मात्र, त्यांना पूर्ण पैसे न मिळाल्यामुळे त्यांनी अलिबाग येथे आत्महत्या केली होती. तिथेच त्यांच्या आई कुमूद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. अन्वय नाईक हे पेशाने आर्किटेक्ट होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आणि त्यांना आत्महत्येला जबाबदार धरले होते. त्यानंतर अन्वय नाईक यांच्या पत्नीने अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र, सदर प्रकरणाचा तपास तत्कालीन सरकारमधील बड्या नेत्यांच्या दबावामुळे योग्य प्रकारे होऊ शकला नाही, असा आरोप अन्वय नाईक यांच्या पत्नीने केला होता.

anvay naik suicide note

- Advertisement -

हेही वाचा – अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण: आमदार प्रताप सरनाईक यांचा १५ ऑगस्टला सत्याग्रह


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -