घरलाईफस्टाईलशेंगदाण्याच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम

शेंगदाण्याच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम

Subscribe

शेंगदाणे खाण्याचे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटेही आहेत.

थंडीच्या दिवसात शेंगदाण्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. शेंगदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. त्यामुळे शेंगदाण्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. परंतु जास्त प्रमाणात शेंगदाणे खाल्याने त्याच आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. शेंगदाणे खाण्याचे जसे फायदे आहेत तसे त्याचे तोटेही आहेत. जाणून घेऊया शेंगदाण्याच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम.

  • वजन वाढणे

    जास्त प्रमाणात शेंगदाणे खाल्याने वजन वाढू शकते. जर तुम्ही वजन कमी करत असाल तर शेंगदाणे खाणे टाळा. शेंगदाण्यामध्ये असलेल्या कॅलरीजमुळे वजन वाढू शकते.

  • सोडीअमचे प्रमाण वाढते

    शेंगदाण्याचे वेगवेगळे प्रकार खाण्यासाठी मिळतात. मसाले किंवा खारे शेंगदाणे खाल्ल्यामुळे रक्तदाबावर परिणाम होऊ सकतो. जास्त प्रमाणात खारे शेंगदाणे खाल्ल्यामुळे शरीरातील सोडीयमचे प्रमाण वाढते. ब्लड प्रेशर आणि ह्रदयासंबंधित आजार होऊ नये म्हणून शरीरातील सोडीयमचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे.

  • ओमेगा फैटी एसिड

    ओमेगा ६ हे एक पॉलीअनसेचुरेटेड फॅटी एसिड आहे. ज्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण केली जाते. ओमेगा ६ आणि ओमेगा ३ हे शरीरात संतुलित प्रमाणात असणे गरजेचे आहे. शेंगदाण्यामध्ये ओमेगा ३ फॅटी एसिडचे प्रमाण कमी असते.

  • एलर्जी वाढू शकते

    शेंगदाण्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीरात एलर्जी वाढू शकते. शेंगदाण्याचे अति सेवन केल्याने त्वचेवर एलर्जी येऊ शकते. त्वचेला खाज येणे, त्वचा लाल होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे पचनसंस्थाही बिगडू शकते.

    - Advertisement -

    हेही वाचा – पेरू खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -