घरमनोरंजन'या' चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण!

‘या’ चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण!

Subscribe

रश्मिका, स‍िद्धार्थ मल्‍होत्रासह 'मिशन मजनू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये करणार धमाकेदार एन्ट्री

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आता बॉलिवूड विश्वात पदार्पण करणार आहे. रश्मिका, स‍िद्धार्थ मल्‍होत्रासह ‘मिशन मजनू’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एन्ट्री करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा पहिला लूक नुकताच समोर आला असून ज्यामध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा दिसतोय. तर बरेच पुरस्कार मिळवलेला अॅडफिल्म मेकर शांतनु बागची या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शन करणार आहे.

- Advertisement -

‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ सारख्या चित्रपटाच्या निर्मितीनंतर रॉनी स्क्रूवाला आता अमर बुटाला आणि गरिमा मेहता यांच्यासोबत पाकिस्तानच्या भूमीवरील रॉ ऑपरेशन ‘मिशन मजनू’ हा चित्रपट तयार करणार आहे.

- Advertisement -

या चित्रपटात १९७० पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची ही कथा आहे, ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले. परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेली जासूसी थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा ​​एक रॉ एजेंट म्हणून काम करताना दिसणार आहे. यासह दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना प्रतिक्षेत असलेल्या नव्या बॉलिवूड चित्रपटाद्वारे पदार्पण करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री रश्मिका म्हणते की, ‘मला विविध भाषा बोलणाऱ्या प्रेक्षकांचे प्रेम मिळाले आहे, याचा मला खूप आनंद आहे. पुढे म्हणते की, या चित्रपटाची कथा माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, याबद्दल मी निर्मात्यांची आभारी आहे की, त्यांनी मला या चित्रपटाची ऑफर दिली. मी खूप उत्सुक आहे या चित्रपटात काम करण्यासाठी, हिंदी चित्रपटसृष्टीत माझा प्रवास सुरू झाल्याने आणि नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी मी खूप उत्साही आहे.

‘ दरम्यान, कन्नड चित्रपटात अभिनय करणारी सौंदर्यवती आणि प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना हिला नुकतंच सर्च इंजिन गूगलने नॅशनल क्रश घोषित करण्यात आले आहे.


Oops Moment: अन् शॉर्ट ड्रेसने जॅकलिनची केली फजिती, बघा व्हिडिओ
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -