घरट्रेंडिंगFack Check: 'व्हेलेंटाइन डे'ला बॉयफ्रेंडशिवाय कॉलेजमध्ये नो एंट्री!

Fack Check: ‘व्हेलेंटाइन डे’ला बॉयफ्रेंडशिवाय कॉलेजमध्ये नो एंट्री!

Subscribe

कॉलेजने विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या या भन्नाट पत्रामुळे सोशल मीडियावर याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. या पत्रामुळे विद्यार्थी आणि कॉलेजच्या शिक्षकांचीही चांगलीच झोप उडाली आहे.

तरुणांचा सर्वात आवडता आणि जवळचा दिवस आला आहे तो म्हणजे व्हेलेंटाइन डे. या व्हेलेंटाईन डेच्या निमित्ताने एका कॉलेजने विद्यार्थ्यांसाठी एक खास पत्र लिहिले आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये कोणात्याही मुलीला एकटीला प्रवेश मिळणार. मुलीला बॉयफ्रेंड असला पाहिजे.त्याशिया तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नाही, असे या पत्रात लिहिले आहे. कॉलेजने विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या या भन्नाट पत्रामुळे सोशल मीडियावर याबाबत चांगलीच चर्चा रंगली आहे. आग्रा उत्तर प्रदेशच्या सेंट जॉर्ज कॉलेजमधील हे पत्र आहे. या पत्रामुळे विद्यार्थी आणि कॉलेजच्या शिक्षकांचीही चांगलीच झोप उडाली आहे.

काय लिहिलं आहे पत्रात?

व्हेलेंटाइन डे स्पेशल व्हायरल झालेल्या या पत्रात असे लिहिले आहे की, ‘कॉलेजच्या कॅम्पसमध्ये एकट्या मुलीला प्रवेश दिला जाणार नाही. आपल्या बॉयफ्रेंडसोबत काढलेला एक लेटेस्ट फोटो दाखवल्यानंतरच मुलींना कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात येईल. फक्त प्रेम वाटा’, असे या पत्रात लिहिले आहे. व्हेलेंटाइन डेसाठी सर्व तयारी सुरु असल्याचे हे पत्रातून कळत आहे.

- Advertisement -

व्हायरल होत असलेल्या या पत्रात कॉलेजच्या प्रोफेसरची नावेही दिसत आहेत. मात्र सेंट जॉर्ज या कॉलेजने याबाबत स्पष्टिकरण दिले आहे. सध्या प्रचंड व्हायरल होत असलेले हे पत्र कॉलेजकडून देण्यात आलेले नाही असा दावा कॉलेजकडून करण्यात आला आहे. त्याचबरोबर पत्रामध्ये ज्या प्रोफेसरची नावे लिहिली आहेत ते प्रोफेसरही आता कॉलेजमध्ये शिकवत नाहीत असे कॉलेजकडून सांगण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले पत्र पूर्णपणे कोटे असल्याचे कॉलेजकडून सांगण्यात आले आहे. कॉलेजच्या विरोधात व्हायरल होत असलेल्या या खोट्या पत्रामागे कोण आहे याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल असे कॉलेजच्या प्रिन्सिपलकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – स्टेजवर भाजप नेत्याचा अश्लील डान्स; व्हिडिओ व्हायरल

- Advertisement -

 

 

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -